कोरोनाच्या नियंत्रणाच्या उपाययोजनात हयगय नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:25 AM2021-04-12T04:25:07+5:302021-04-12T04:25:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाची स्थिती अधिक चिंताजनक बनत असल्याने अधिक गतीने नियोजन आवश्यक आहे. रुग्णांची संख्या, बेडची ...

Coronary control measures do not help | कोरोनाच्या नियंत्रणाच्या उपाययोजनात हयगय नको

कोरोनाच्या नियंत्रणाच्या उपाययोजनात हयगय नको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाची स्थिती अधिक चिंताजनक बनत असल्याने अधिक गतीने नियोजन आवश्यक आहे. रुग्णांची संख्या, बेडची उपलब्धता याबाबत सर्व लोकप्रतिनिधींना माहिती देण्याचे नियोजन करत कोरोना नियंत्रणसाठीच्या उपाययोजनांमध्ये अजिबात हयगय नको, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार संजयकाका पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढत असल्याने कोरोनाची दुसरी लाट गंभीर होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात सध्या लसीकरणाने गती घेतली आहे. हे सकारात्मक बाब असलीतरी अजून लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा एक ग्रुप तयार करून त्यावर अद्ययावत माहिती दिल्यास त्याचा फायदा होणार आहे.

ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा समितीला विश्वात घेऊन नियाेजन केल्यास प्रशासनाला मदतच होणार आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत असून, याबाबत कठोर कारवाई करत योग्य किमतीला इंजेक्शन मिळेल यासाठी निर्देश देण्यात यावेत. जिल्हा क्रीडा संकुल येथील कोरोना सेंटरही तातडीने सुरू करण्याच्याही सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.

जिल्ह्यात सध्या ३३ ठिकाणी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल,दहा ठिकाणी डेडिकेटेड कोविड

हेल्थ सेंटर, ११ ठिकाणी कोविड केअर सेंटर अशा ५४ ठिकाणी उपचारांची सुविधा उपलब्ध

असून, या ठिकाणी तीन हजार १६० बेड्स आहेत. यापैकी एक हजार ९७७ ऑक्सिजिनेटेड बेड तर ६०० आयसीयू बेडपैकी २४५ बेड्सना व्हेंटिलेटर आणि ७६ बेड्सना एचएफएनओ सुविधा आहेत.जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५.५ असून, बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

यावेळी आमदार मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, अरुण लाड, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी

डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.

चौकट

ग्रामीण भागात कारवाईच होत नाहीत; कदम

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, गेल्यावर्षी लॉकडाऊनवेळी होत असलेल्या कारवाया आता ग्रामीण भागात दिसत नाहीत. आता कडक निर्बंध नाहीतच असे वातावरण आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी पाेलिसांनीही कारवाई वाढवून कडक निर्बंधांची अंमलबजावणी करायला हवी.

चौकट

होम आयसोलेशनवर नजर ठेवा

पालकमंत्री पाटील म्हणाले, होम आयसोलेशनमधील रुग्ण बाहेर फिरत असल्याने संसर्ग वाढत आहे. त्यामुळे पोलिसांना होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. होम आयसोलेशनवर विशेष लक्ष दिल्यास संसर्ग कमी होणार असल्याने नियम मोडणाऱ्यांवर आता कारवाई करा.

Web Title: Coronary control measures do not help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.