कोरोनास्थिती हाताबाहेर; सागाव पूर्ण लॉक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:28 AM2021-05-27T04:28:32+5:302021-05-27T04:28:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथील वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी, मुख्य चौकातून गावात येणारा रस्ताच अडसर ...

Coronary state out of hand; Sagav complete lock! | कोरोनास्थिती हाताबाहेर; सागाव पूर्ण लॉक!

कोरोनास्थिती हाताबाहेर; सागाव पूर्ण लॉक!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथील वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी, मुख्य चौकातून गावात येणारा रस्ताच अडसर लावून पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे ग्रामस्थ तसेच बाहेरील लोकांना ‘नो एन्ट्री’ असणार आहे.

गेल्या महिनाभरापासून येथील कोरोना रुग्णसंख्या ग्रामस्थांच्या बेफिकिरीमुळे वाढत चालली आहे. गावाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय ठरला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, तहसीलदार, स्थानिक प्रशासन प्रयत्न करीत आहे; परंतु अजूनही म्हणावे तसे यश आलेले नाही. गत आठवड्यात मार्शल कमांडो फोर्सची टीम गावात बंदोबस्तासाठी निमंत्रित करण्यात आली आहे, तरीसुद्धा त्यांना चकवा देत, विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. परिणामी, रुग्णसंख्या घटण्याऐवजी वाढतच चालली आहे. सध्या सागाव गावात रुग्णसंख्या दोनशेवर पोहोचली आहे.

त्यामुळे बेशिस्तीला आवर घालण्यासाठी गावातील मुख्य चौकातून गावात आत येणारा रस्ताच अडसर लावून बंद करण्यात आला आहे.

Web Title: Coronary state out of hand; Sagav complete lock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.