वाळव्यात कोरोनाचा कहर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:26 AM2021-04-24T04:26:58+5:302021-04-24T04:26:58+5:30

वाळवा : येथील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा १५६ झाला आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही नागरिक बेजबाबदारपणे वागत ...

Corona's havoc increased in the desert | वाळव्यात कोरोनाचा कहर वाढला

वाळव्यात कोरोनाचा कहर वाढला

Next

वाळवा : येथील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आकडा १५६ झाला आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. यामुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. वास्तविक, नियमांचे पालन होणे गरजेचे आहे.

पाॅझिटिव्ह रुग्ण होम क्वारंटाईन होतात; पण ते होम क्वारंटाईन असताना बेफिकीरपणे गावातून फिरत असतात. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या अन्य नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केलेल्यांमध्ये १५६ जण पाॅझिटिव्ह आले. सध्या यापैकी १०० ॲटिव्ह रुग्ण आहेत. ८० होम क्वारंटाईन आहेत. तर १७ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. ४८ बरे झाले आहेत.

वाळवा येथे ५८८८४ पैकी ३१११४, जुनेखेड ७१९ पैकी ६४९, नवेखेड १०९७ पैकी १०२५, पडवळवाडी ६८० पैकी ५०९, अहिरवाडी २६३ पैकी २१४ जणांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स लसीकरणासाठी परिश्रम घेत आहेत.

कोट

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणेला सहकार्य केल्यास कोरोनावर मात करणे शक्य होणार आहे.

- डाॅ. वैभव नायकवडी, वैद्यकीय अधिकारी, वाळवा प्राथमिक आरोग्य केंद्र

Web Title: Corona's havoc increased in the desert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.