CoronaVirus : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी; आठ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:28 AM2020-05-30T10:28:51+5:302020-05-30T10:30:22+5:30
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना गुरुवारी एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आडवळणी दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी नेर्ली (कडेगाव) येथील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आठ जणांना कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
सांगली: जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना गुरुवारी एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आडवळणी दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी नेर्ली (कडेगाव) येथील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आठ जणांना कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यात नव्याने बाधित सर्वजण मुंबई येथून आले आहेत. आता जिल्ह्यातील बाधीतांची संख्या १०९ झाली आहे. नेर्ली तालुका कडेगाव येथील ५७ वर्षीय व्यक्तीवर मिरज येथे उपचार सुरू होते. या रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती.
रुग्णाला नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना मधुमेह होता.ही व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली होती. या रुग्णाचा मृत्यू झाला आहे . जिल्ह्यात आज आखेर मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या नव्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आठ ने वाढ झाली आहे. यामध्ये औंढी तालुका जत येथील ५५ वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. ही व्यक्ती १६ मे रोजी मुंबईहून आलेली आहे .
खानापूर तालुक्यातील करंजे येथील ३० वर्षिय पुरुष कोरोणा बाधित झाला असून ही व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली आहे. कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील कोरोणा पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा २७ वर्षाचा मुलगाही कोरोणा बाधित झाला आहे.
रेड तालुका शिराळा येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा निकटवर्तीय २० वर्षीय पुरुष नातेवाईक कोरोणा बाधित झाला आहे. खिरवडे तालुका शिराळा येथील कोरोणा बाधित व्यक्तीच्या निकटवर्तीय ५२ वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे. कचरेवाडी तालुका तासगाव येथील २८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित झाला आहे.
आंबेगाव तालुका कडेगाव येथील कोरोना बाधित झालेल्या रुग्णाची बारा वर्षीय मुलगी तसेच नऊ वर्षीय मुलगा ही कोरोना बाधित झाला. नव्याने आढळलेल्या आठ रुग्णामुळे जिल्ह्यातील कोरोना पाणी त्यांची संख्या १०९ झाली आहे