CoronaVirus Lockdown :जिल्ह्यातील उद्योजकांच्या लॉकडाऊन शिथिलतेकडे नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:29 AM2020-04-20T11:29:10+5:302020-04-20T11:31:14+5:30

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामधील यंत्रांची धडधड पूर्णपणे थंडावली आहे. सुमारे तीन हजार कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. टेक्स्टाईल, फौंड्री, इंजिनिअरिंगसह इतर उद्योगांना घरघर लागली आहे. अडचणीत सापडलेल्या औद्योगिक क्षेत्राला नव्याने उभारी येण्यासाठी उद्योग लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे असून, उद्योजकांच्या नजरा लॉकडाऊन शिथिलतेकडे लागल्या आहेत.

CoronaVirus Lockdown: | CoronaVirus Lockdown :जिल्ह्यातील उद्योजकांच्या लॉकडाऊन शिथिलतेकडे नजरा

CoronaVirus Lockdown :जिल्ह्यातील उद्योजकांच्या लॉकडाऊन शिथिलतेकडे नजरा

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील उद्योजकांच्या लॉकडाऊन शिथिलतेकडे नजराजिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामधील यंत्रांची धडधड पूर्णपणे थंड

महालिंग सलगर 

कुपवाड : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामधील यंत्रांची धडधड पूर्णपणे थंडावली आहे. सुमारे तीन हजार कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. टेक्स्टाईल, फौंड्री, इंजिनिअरिंगसह इतर उद्योगांना घरघर लागली आहे. अडचणीत सापडलेल्या औद्योगिक क्षेत्राला नव्याने उभारी येण्यासाठी उद्योग लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे असून, उद्योजकांच्या नजरा लॉकडाऊन शिथिलतेकडे लागल्या आहेत.

जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी, मिरज एमआयडीसी, इस्लामपूर, जत, कडेगाव, पलूस, शिराळा, विटासह इतर सहकारी औद्योगिक वसाहतींचा समावेश आहे. येथे तीन हजारहून अधिक उद्योग आहेत. यात टेक्स्टाईल, फौंड्री, इंजिनिअरिंग, अन्न प्रक्रिया उद्योगासह इतरांचा समावेश आहे. आधीच आर्थिक मंदी आणि गतवर्षीच्या पुरामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये निराशेचे चित्र दिसून येत होते. त्यातच अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे उद्योजक अडचणीत सापडले आहेत.

मार्च महिन्यात अचानक आलेल्या या संकटामुळे उद्योगांचे कंबरडेच मोडले असून सुमारे तीन हजार कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. उत्पादित मालाचा साठाही मोठ्या प्रमाणात पडून आहे. भविष्यात उद्योग बंदी उठविल्यानंतर उद्योजकांकडून हा उत्पादित माल ग्राहकांकडे पाठविल्यानंतर त्याची देयके लवकर येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यातच आर्थिक टंचाईतून मार्गक्रमण करीत असलेल्या उद्योजकांना कामगारांचा पगार देण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
 

Web Title: CoronaVirus Lockdown:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.