CoronaVirus Lockdown : खबरदार, सार्वजनिक ठिकाणी थुंकाल तर...होणार गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 02:18 PM2020-04-21T14:18:09+5:302020-04-21T14:21:32+5:30
कोरोना विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात येवून शिंकलेने, खोकलेने होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेने हा विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली असून थुंकणार्याविरूद्ध गुन्हा केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला.
सांगली : कोरोना विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात येवून शिंकलेने, खोकलेने होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेने हा विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली असून थुंकणार्याविरूद्ध गुन्हा केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला.
चौधरी म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक रस्त्यावर थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध असे मानण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल.
गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, कर्मचारी यांना या आदेशान्वये प्राधिकृत करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.