CoronaVirus Lockdown : लॉकडाऊन काळात औषधांचा खप ५० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:16 PM2020-05-23T17:16:22+5:302020-05-23T17:17:19+5:30
लॉकडाऊनचे अनेक वाईट परिणाम दिसले, अनेक चांगले बदलही लोकांनी अनुभवले. यातील एक चांगला बदल म्हणजे औषधांचा घसरलेला खप. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्याची औषधविक्री निम्म्यावर आली आहे.
सांगली : लॉकडाऊनचे अनेक वाईट परिणाम दिसले, अनेक चांगले बदलही लोकांनी अनुभवले. यातील एक चांगला बदल म्हणजे औषधांचा घसरलेला खप. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्याची औषधविक्री निम्म्यावर आली आहे.
लॉकडाऊनमध्ये बंद राहिलेली रुग्णालये, लांबलेल्या शस्त्रक्रिया, घटलेले अपघात आणि लोकांचे सुधारलेले आरोग्य, ही त्याची प्रमुख कारणे आहेत.
गेले दोन महिने औषध दुकानांसमोरील गर्दी फक्त मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा नियमित रुग्णांचीच होती. लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या काळात लोकांनी औषधे संपण्याच्या भीतीने साठेबाजी केली, पण नंतर हा वेगही ओसरला.
ही घसरण अजूनही कायम आहे. जिल्ह्याचा औषधांचा महिन्याचा खप तीस कोटी रुपयांचा आहे.