CoronaVirus Lockdown : शेजारील जिल्ह्यात काम करणाऱ्या कामगारांना ये-जा करण्यास पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 11:38 AM2020-06-06T11:38:16+5:302020-06-06T11:43:01+5:30
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यत येत आहेत. लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊन वाढवीत असताना शासनाने राज्याची आर्थिक बाजू सक्षम होण्याच्या दृष्टीने उद्योग घटकांना परवानगी दिली आहे.
सांगली : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यत येत आहेत. लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊन वाढवीत असताना शासनाने राज्याची आर्थिक बाजू सक्षम होण्याच्या दृष्टीने उद्योग घटकांना परवानगी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार जे सांगली जिल्हा हद्दीला लागून असणाऱ्या जिल्ह्यातील उद्योग घटकांमध्ये कामास आहेत अशा कामगारांना सदर उद्योग घटकांमध्ये ये-जा करण्यासाठी दैनंदिन पास देणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांना जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार, जे सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या जिल्ह्यातील उद्योग घटकांमध्ये कामास आहेत, अशा कामगारांना सदर उद्योग घटकांमध्ये ये-जा करण्यास दैनंदिन पास देण्यासाठी प्राधिकृत केले आहे.
बाहेर जाणाऱ्यांची संख्या १ लाख ४० हजाराहून अधिक तर येणाऱ्यांची संख्या ५५ हजाराहून अधिक
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाऊन जारी आहे. लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर व राज्यातील अन्य जिल्ह्यात अडकून पडल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातही अन्य जिल्ह्यातील व राज्याबाहेरील व्यक्ती अडकून पडल्या आहेत. या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.
दिनांक ४ जून पर्यंत सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर व अन्य जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या १ लाख ४० हजार ६९१ इतकी असून सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या ५५ हजार ९०६ इतकी आहे. अशा येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या १ लाख ९६ हजार ५९६ इतकी आहे. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली.
यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या३७ हजार ४९२ व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या १लाख ३ हजार १९९ व्यक्ती आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून येणाऱ्या १२ हजार ४४४ व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या ४३ हजार ४६२ व्यक्तींचा समावेश आहे.