CoronaVirus Lockdown : आरोग्य विषयक हेल्पलाईनचा अनेकांना होतोय लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:33 PM2020-04-22T12:33:16+5:302020-04-22T12:36:04+5:30

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन आणि आयएमए सांगली व मिरज मार्फत हेल्पलाईन क्रमांक 9821808809 सुरु करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून आरोग्याशी निगडीत अनेकांचे शंका, समाधान होत आहे.

CoronaVirus Lockdown: Many benefit from health helpline | CoronaVirus Lockdown : आरोग्य विषयक हेल्पलाईनचा अनेकांना होतोय लाभ

CoronaVirus Lockdown : आरोग्य विषयक हेल्पलाईनचा अनेकांना होतोय लाभ

Next
ठळक मुद्देआरोग्य विषयक हेल्पलाईनचा अनेकांना होतोय लाभहेल्पलाईन १२ तास चालू

सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय व्यवसायीकांकडे जाण्यासाठी अनेकदा अडचणीचे येते. अशा स्थितीत त्यांना तातडीची मदत व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन आणि आयएमए सांगली व मिरज मार्फत हेल्पलाईन क्रमांक 9821808809 सुरु करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून आरोग्याशी निगडीत अनेकांचे शंका, समाधान होत आहे.

याबाबत आयएमए सांगलीचे अध्यक्ष डॉ. रणजीतसिंह जाधव म्हणाले, या हेल्पलाईनवर सांगली, मिरज येथील एमडी तज्ज्ञ डॉक्टर सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत उपस्थित असतात. ही हेल्पलाईन १२ तास चालू असते.

हेल्पलाईन क्रमांकावर दररोज २० ते २५ कॉल येतात. विचारलेल्या आरोग्यांच्या तक्रांरीवर या ठिकाणी उपलब्ध असणारे डॉक्टर मार्गदर्शन करतात. काही वेळा आरोग्य विषयक समस्या शिवाय ही अन्य बाबीबाबत माहिती विचारणारे कॉलही येतात.

याबाबत संबंधितांना ते फॉरवर्ड करून शंका, समाधान केले जात आहे. सोशल मीडियावरून कोविड-19 च्या अनुषंगाने बरीच माहिती आपल्याकडे गोळा झालेली असते. ही माहिती खरी आहे की खोटी आहे याची कल्पना आपल्याला नसते व मनात गोंधळ निर्माण होतो.

हा गोंधळ दूर करण्यासाठी हेल्पलाईन नंबर वर फोन करून विचारू शकता. जर आपल्याला घरामध्ये किंवा घराच्या आसपास लागण झोलेली व्यक्ती किंवा तशी लक्षणे दिसत असल्यास त्याबद्दल काही शंका असल्यास हेल्पलाईनवर संपर्क करू शकता. तसेच अशा प्रकारचे रूग्ण कोणत्या दवाखान्यामध्ये पाठवायचे याबद्दलही माहिती विचारू शकता.
 

 

Web Title: CoronaVirus Lockdown: Many benefit from health helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.