CoronaVirus Lockdown : कोरोनापेक्षाही भयंकर मोबाईलरूपी व्हायरस; तुंगच्या घटनेने गांभीर्य वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 03:40 PM2020-05-26T15:40:31+5:302020-05-26T15:43:24+5:30

मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर येथे एका अल्पवयीन मुलाने आठवर्षीय मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून केला. त्या मुलीला मोबाईलवर पॉर्न क्लिप दाखवित या मुलाने हा अत्याचार केल्याने, घटनेतील गांभीर्य अधिक वाढले आहे.

CoronaVirus Lockdown: A more deadly mobile virus than Corona; The fall of Tung added to the seriousness | CoronaVirus Lockdown : कोरोनापेक्षाही भयंकर मोबाईलरूपी व्हायरस; तुंगच्या घटनेने गांभीर्य वाढले

CoronaVirus Lockdown : कोरोनापेक्षाही भयंकर मोबाईलरूपी व्हायरस; तुंगच्या घटनेने गांभीर्य वाढले

Next
ठळक मुद्देकोरोनापेक्षाही भयंकर ठरतोय मोबाईलरूपी व्हायरस; तुंगच्या घटनेने गांभीर्य वाढलेकुटुंबातील संवाद हरवतोय; मोबाईलचा अतिवापर ठरतोय घातक

सांगली : मिरज तालुक्यातील तुंगजवळील विठलाईनगर येथे एका अल्पवयीन मुलाने आठवर्षीय मुलीवर अत्याचार करून, तिचा गळा आवळून खून केला. त्या मुलीला मोबाईलवर पॉर्न क्लिप दाखवित या मुलाने हा अत्याचार केल्याने, घटनेतील गांभीर्य अधिक वाढले आहे.

अजाणत्या वयात हाती आलेला मोबाईल आणि त्याचा माहीत नसलेला योग्य वापर, तसेच त्याचा योग्य वापरापेक्षा गैरवापरच अधिक होत असल्याने, अल्पवयीन मुलांच्या हाती मोबाईल देणे घातक ठरत आहे. सध्या सर्वत्र दहशत असलेल्या कोरोनापेक्षाही हा मोबाईलरूपी व्हायरसच अधिक चिंतनीय आहे, अशाच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


तुंग येथील घटना सुन्न करणारी असून पालकांनी आपल्या मुलांना किती ह्यटेक्नोसॅव्हीह्ण करावे, याचा विचार करायला लावणारी आहे. मुलांच्या हाती मोबाईल दिल्यानंतर आई-वडिलांसह कुटुंबातील ज्येष्ठांनी मुलांवर लक्ष द्यायला हवे. पॉर्न फिल्म असो किंवा गेम्स, त्यामुळे मुलांकडून असे गैरप्रकार घडत आहेत. कुटुंबातील संवाद हरविल्यानेही मुले मोबाईलमध्ये अडकून पडत आहेत. त्यामुळे पालकांनी, समाजातील प्रत्येक घटकांनी संवेदनशीलता जपावी.
- मनीषा दुबुले,
अप्पर पोलीस अधीक्षक


अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अशा प्रकाराला अनेक घटक कारणीभूत आहेत. लहान मुलांकडे पालक मोबाईल देतातच कसे, यापासून ते त्यावर पालकांचे नियंत्रण किती? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तंत्रज्ञानामुळे आपण संपर्कात आलो असलो तरी, त्यांचा मुलांकडून कार्टून, गेमसाठी होणारा वापर घातक असून, त्यामुळे मुले कमी वयात आक्रमक होत आहेत. लहान कोवळ्या मनावर जे बिंबवता येईल ते बिंबत असल्याने या मुलांमध्येही मोबाईलमुळे बदल घडत आहेत. आपल्या मुलांवर पालकांनी ह्यक्लोज वॉचह्ण ठेवणे हाच यावरील मुख्य पर्याय वाटतो आहे.
डॉ. अनिता पागे,
वैद्यकीय तज्ज्ञ


आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्येकाला समज असावी हे जरी खरे असले तरी, मोबाईलचा अतिवापर अधोगतीला नेत आहे. मोबाईलमधील अतिनील किरणे मुलांच्या डोळ्याला त्रासदायक तर ठरतातच, शिवाय चिडचीड, झोप न लागणे असेही त्रास निर्माण करत आहेत. ह्यस्क्रीन अ‍ॅडीक्टह्ण झालेल्या मुलांमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वयाच्या १८ नंतरच मुलांकडे मोबाईल द्यावा.
- प्रा. डॉ. संतोष माने,
शैक्षणिक तज्ज्ञ



मुलांना मोबाईल द्यावा व त्यावर त्यांनी अभ्यास करावा, असा प्रवाह पुढे येत असतानाच, तुंगची घटना धक्कादायक आहे. पालक हौस म्हणून मुलांना मोबाईल देतात. पण कुतूहलापोटी मोबाईल हाती आल्यानंतर त्याची सवयच मुलांना लागत आहे. ज्याप्रमाणे विषाणू दिसत नसतो, अगदी तसेच मोबाईलचे दुष्परिणामही दिसून येत नाहीत. त्यामुळे पालकांनी मुलांचे मोबाईलचे लाड न पुरविता त्यांना इतर गोष्टींची सवय लावावी.
- दयासागर बन्ने,
साहित्यिक


मुलांना सहजपणे उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे त्याचा योग्य वापर त्यांना माहीत नाही. पालकही मुलांना मोबाईल, इंटरनेट उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या भावनिक बदलाकडे लक्ष देऊन त्यांना सुविधा द्याव्यात. त्यांच्या भावना समजून घेतल्यास बºयाच अडचणी दूर होणार आहेत. किशोरवयीन मुलांचे पालकत्व हे सध्या आव्हानात्मक बनत आहे.
- पूनम गायकवाड,
मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: CoronaVirus Lockdown: A more deadly mobile virus than Corona; The fall of Tung added to the seriousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.