CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात 16 लाख 88 हजार 65 रूपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:39 PM2020-04-22T12:39:49+5:302020-04-22T12:41:51+5:30

कारवाईमध्ये 950.40 ब. लि. विदेशी मद्य व 167 ब.लि. ताडी जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सांगली च्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली.

CoronaVirus Lockdown: Property worth Rs 16 lakh 88 thousand 65 seized in the district | CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात 16 लाख 88 हजार 65 रूपयांचा मुद्देमाल जप्त

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात 16 लाख 88 हजार 65 रूपयांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात 16 लाख 88 हजार 65 रूपयांचा मुद्देमाल जप्तअवैध व भेसळयुक्त मद्यविक्री होत असल्यास माहिती द्या

सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे संचारबंदी आदेश लागू केले आहेत. तसेच मुंबई दारूबंदी कायदा 1949 अन्वये मंजूर असणाऱ्या सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सांगली जिल्ह्यात 23 मार्च ते 19 एप्रिल 2020 या कालावधीमध्ये एकूण 83 गुन्हे नोंद करून 54 आरोपींना अटक करून 13 वाहनांसह एकूण 16 लाख 88 हजार 65 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये 950.40 ब. लि. विदेशी मद्य व 167 ब.लि. ताडी जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सांगली च्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली.

लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याबाबत आदेश असताना या आदेशाचे उल्लंघन करून चोरट्या पध्दतीने बेकायदेशीरपणे मद्यविक्री करण्यासाठी अनुज्ञप्ती सुरू ठेवल्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये हॉटेल वैभव मिरज, हॉटेल रायगड शेगांव ता. जत व शिवतेज बिअर शॉपी या मद्यविक्री अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे अधीक्षक किर्ती शेडगे यांनी सांगितले.

लॉकडाऊन परिस्थितीचा फायदा घेऊन शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध तसेच भेसळयुक्त मद्यविक्री, हातभट्टी विक्री तसेच मद्याचा काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा मद्याच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपाय व हानी होऊ शकते. नागरिकांनी अशा प्रकारच्या मद्याची खरेदी अथवा सेवन करू नये. तसेच अशा मद्याची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्वरीत राज्य उत्पादन शुल्क विभागास माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक किर्ती शेडगे यांनी केले आहे.

 

Web Title: CoronaVirus Lockdown: Property worth Rs 16 lakh 88 thousand 65 seized in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.