CoronaVirus Lockdown : आॅनलाईन मद्यविक्रीला परमिट रुमचालकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 04:28 PM2020-05-16T16:28:31+5:302020-05-16T16:31:05+5:30
शासनाने वाईन शॉप व बिअर शॉपीना मद्यविक्रीसाठी हिरवा कंदील दर्शविल्यानंतर परमिट रुम चालकही आक्रमक झाले आहेत. लॉकडाऊनमुळे हॉटेल व परमिट रुमचालकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने दारुच्या होम डिलीव्हरीसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सांगली : शासनाने वाईन शॉप व बिअर शॉपीना मद्यविक्रीसाठी हिरवा कंदील दर्शविल्यानंतर परमिट रुम चालकही आक्रमक झाले आहेत. लॉकडाऊनमुळे हॉटेल व परमिट रुमचालकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने दारुच्या होम डिलीव्हरीसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
खाद्य पेय विक्रेता मालक संघाने पत्रकार बैठकीत सांगितले कि, शासनाने सातत्याने वाईन शॉप व बियर शॉपीच्या बाजुनेच निर्णय घेतले आहेत. महामार्गापासून पाचशे मीटर अंतराची अट घालतानाही परमीट रुमच्या नुकसानीचा विचार केला नाही.
आता लॉकडाऊनमध्येही त्यांनाच परवानगी दिली. आमचा व्यवसाय बंद असल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. कामगारांचे वेतन, त्यांना सांभाळण्याचा खर्च, वार्षिक परवाना शुल्क यामुळे हॉटेल व परमीट रुमचालक मेटाकुटीला आले आहेत. संघाचे अध्यक्ष लहू भडेकर म्हणाले, आणखी दोन महिने अशीच स्थिती राहिली तर व्यावसायिकांना आत्महत्या करावी लागेल.
मिलंींद खिलारे म्हणाले, जिल्ह्यातील ५६५ हॉटेल व परमीट रुम व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क अधिक्षकांशी चर्चा केली, पण लॉकडाऊन उठेपर्यंत परवानगी शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. शासनाला करस्वरुपात लाखंोचा महसुल देऊनही अन्याय केला जात आहे. रमेश शेट्टी म्हणाले, हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्संींगसह कोरोनाविषयक खबरदारी घेत व्यवसायाची आमची तयारी आहे. त्यालाही प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद नाही.
भडेकर यांनी इशारा दिला कि, याविरोधात संघटनेला लढ्याचा पवित्रा घ्यावा लागेल. राज्यभरात संदेश पोहोचवून उठाव करु. शासनाने आॅनलाईन विक्रीच्या निर्णयाचा फेरविचार करावा व आम्हालाही पासर्ल सुविधेची परवानगी द्यावी.
आॅनलाईनमुळे परमिट रुम व्यवसायाला धोका
खिलारे म्हणाले, वाईन शॉपमधून आॅनलाईन विक्रीला आमचा विरोध आहे. ग्राहकांना आॅनलाईन खरेदीची सवय लागली तर भविष्यात ते परमिट रुम व बारमध्ये येणार नाहीत.