CoronaVirus Lockdown : सांगली महानगरपालिका हद्दीत कंटेनमेंट झोन व बफर झोन जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 03:13 PM2020-04-20T15:13:31+5:302020-04-20T15:14:37+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपयोजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील कन्टेन्ट व बफर झोन जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपयोजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील कन्टेन्ट व बफर झोन जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
शहरातील विजय नगर परिसरात कोरूना रुग्ण आढळून आल्याने व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी विजयनगर परिसरातील बाहेर जाण्यास व आतमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यानुसार रूग्ण आढळून आलेला परिसर कंटेनमेंट झोन असणार आहे तर त्या पुढील चार किलोमीटरचा परिसर बफर झोन असणार आहे.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - 1) विश्रामबाग चौक (हॉटेल हरीश) ते विश्रामबाग रेल्वे फाटक, (2) विश्रामबाग रेल्वे फाटक ते विद्यानगर वारणाली ते जिल्हा परिषद कॉलनी, (3) जिल्हा परिषद कॉलनी ते कुमार हासुरे नगर ते अहिल्यादेवी होळकर चौक (चाणक्य चौक), (4) अहिल्यादेवी होळकर चौक (चाणक्य चौक) ते पालवी हॉटेल (बायपास रोड), (5) पालवी हॉटेल (बायपास रोड) ते भारती हॉस्पीटल सांगली मिरज रोड, (6) भारती हॉस्पीटल ते वानलेसवाडी ते हसनी आश्रम चौक, (7) हसनी आश्रम चौक ते स्फुर्ती चौक ते विश्रामबाग चौक (हॉटेल हरीश). जिल्हा न्यायालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व जिल्हाधिकारी कार्यालयास यातून वगळण्यात आले आहे.
भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.