CoronaVirus :सांगली जिल्ह्यातील तेराजणांना कोरोनाचे निदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 01:53 PM2020-06-13T13:53:15+5:302020-06-13T13:57:30+5:30
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी वाढ झाली. मणदुर येथील पाचजण, बुधगाव येथील दोघे, पलूस, पणुब्रे,खेड, माळेवाडी, भाळवणी आणि भिकवडी येथील बाधितांत समावेश आहे.
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी वाढ झाली. मणदुर येथील पाचजण, बुधगाव येथील दोघे, पलूस, पणुब्रे,खेड, माळेवाडी, भाळवणी आणि भिकवडी येथील बाधितांत समावेश आहे.
शनिवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार तेराजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक रूग्ण असलेल्या व हॉटस्पॉट बनलेल्या मणदूर येथील अजून ५ जण कोरोनाबाधित झाले आहेत. येथील रुग्ण संख्या आता ३६ झाली आहे. याशिवाय शिराळा तालुक्यातील आणखी तीन गावात मुंबईहून आलेले कोरोनाग्रस्त झाले आहेत. यामुळे शिराळा तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या ६७ झाली आहे.
खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील ६० वर्षीय वृध्दा, भिकवडी बुद्रुक येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा यात समावेश आहे. तर बुधगाव येथे मुंबईहून आलेल्या दोघांना कोरोना झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या २१९ झाली असून १११ जण कोरोनमुक्त झाले आहेत तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.