CoronaVirus :सांगली जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोनाबाधित, उपचाराखाली 52 रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 04:54 PM2020-06-03T16:54:25+5:302020-06-03T16:55:22+5:30

सांगली जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत दोन रुग्ण कोरोणाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 52 झाली आहे. आज अखेर 68 रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण 124 रुग्ण कोरोणाबाधित ठरले आहेत. कोरोना बाधित रुग्णांपैकी एका रुग्णांची स्थिती चिंताजनक असून तिघांची स्थिती स्थीर आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

CoronaVirus: Two patients infected with corona in Sangli district, 52 patients under treatment | CoronaVirus :सांगली जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोनाबाधित, उपचाराखाली 52 रूग्ण

CoronaVirus :सांगली जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोनाबाधित, उपचाराखाली 52 रूग्ण

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोनाबाधितसद्यस्थितीत उपचाराखाली 52 रूग्ण

सांगली : सांगली जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत दोन रुग्ण कोरोणाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 52 झाली आहे. आज अखेर 68 रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण 124 रुग्ण कोरोणाबाधित ठरले आहेत. कोरोना बाधित रुग्णांपैकी एका रुग्णांची स्थिती चिंताजनक असून तिघांची स्थिती स्थीर आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

आज कोरोना बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यातील झरे येथील 58 वर्षाची महिला पॉझिटीव्ह आली असून सदर महिला दि. 26 मे रोजी मुंबईहून आली होती. या महिलेस अगोदरपासूनच मधूमेह, उच्चरक्तदाब, थायरॉईडचा विकार (हायपोथायरॉईडीजम) हे विकार आहेत. तसेच जत तालुक्यातील खलाटी येथील 60 वर्षाचा पुरूष कोलकत्ता, नागपूर, पूणे येथून प्रवास करून आलेला असून तो पॉझिटीव्ह आला आहे.

पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी औंढी तालुका जत येथील 55 वर्षीय पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून सदर रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. कडेबिसरी (सांगोला, सोलापूर) येथील 48 वर्षाच्या पुरूष रूग्णाला ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे.

खिरवडे (शिराळा) येथील 56 वर्षाच्या पुरूष रूग्णावर सद्यस्थितीत नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. मणदुर (शिराळा) येथील 81 वर्षाच्या पुरूष रूग्णास नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला असून रूग्णाची स्थिती स्थीर आहे.
 

Web Title: CoronaVirus: Two patients infected with corona in Sangli district, 52 patients under treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.