नगरसेवक पद अपात्रता; २९ रोजी होणार सुनावणी

By admin | Published: April 21, 2016 11:57 PM2016-04-21T23:57:03+5:302016-04-22T00:49:23+5:30

निर्णयास आवटी व बागवान यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Corporator post disqualification; The hearing will be held on 29th | नगरसेवक पद अपात्रता; २९ रोजी होणार सुनावणी

नगरसेवक पद अपात्रता; २९ रोजी होणार सुनावणी

Next

मिरज : महापालिकेवर दगडफेक व शिक्षेच्या कारणावरुन नगरसेवक पद अपात्र ठरविण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर सुरेश आवटी व मैनुद्दीन बागवान यांच्या अपिलाबाबत २९ जून रोजी सुनावणी होणार आहे.
सुनावणीदरम्यान निकालास स्थगिती व महापालिका कामकाजात भाग घेण्याच्या मागणीबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही. महापालिकेवर मोर्चा काढून दगडफेक केल्याप्रकरणी मिरज न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली असल्याने जिल्हा न्यायालयाने सुरेश आवटी व मैनुद्दीन बागवान यांचे नगरसेवक पद रद्दचा निर्णय दिला आहे. या निर्णयास आवटी व बागवान यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती व महापालिकेच्या कामकाजात भाग घेऊ देण्याची मागणी आवटी व बागवान यांनी न्यायालयाकडे केली. मात्र या मागणीवर न्यायालयाने कोणताही निर्णय न देता दि. २९ जून रोजी पुढील तारीख दिली. (वार्ताहर)
पुन्हा संघर्ष
मिरजेतील प्रभाग ३० मध्ये उमेदवाराच्या पात्रतेबाबतच्या तक्रारीमुळे पोटनिवडणूक पार पडली. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा न्यायालयीन संघर्षाची शक्यता आहे. बेकायदा बांधकाम केल्याने व जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने काँगे्रस उमेदवाराला अपात्र ठरविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.

Web Title: Corporator post disqualification; The hearing will be held on 29th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.