लाचखोर लेखाधिकारी, लेखापरीक्षकाला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:31 AM2021-08-12T04:31:14+5:302021-08-12T04:31:14+5:30

सांगली : निवड श्रेणी व वेतन श्रेणी पडताळणी करून स्टॅम्पिंग करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या ...

Corrupt Accountant, Cell to Auditor | लाचखोर लेखाधिकारी, लेखापरीक्षकाला कोठडी

लाचखोर लेखाधिकारी, लेखापरीक्षकाला कोठडी

Next

सांगली : निवड श्रेणी व वेतन श्रेणी पडताळणी करून स्टॅम्पिंग करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या लेखापरीक्षण पथकातील शिक्षण विभागाचा लेखाधिकारी बाबासाहेब महादेव जाधव (वय ३८, रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) आणि बबन रामचंद्र कोळी (५७, रा. इनामधामणी, ता. मिरज) या दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

तक्रारदारांनी निवड श्रेणी पडताळणी स्टॅम्पिंगसाठी व त्यांच्या सहकारी मित्राने वरिष्ठ वेतन श्रेणी पडताळणी व स्टॅम्पिंग करून मिळण्यासाठी लेखाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता. या कार्यालयातील लेखाधिकारी जाधव व कनिष्ठ लिपिक कोळी यांनी त्यांच्याकडे काम पूर्ण करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. मध्यवर्ती शासकीय इमारतीतील लेखापरीक्षण विभागात सोमवारी दुपारी सापळा लावून दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. मंगळवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Corrupt Accountant, Cell to Auditor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.