दिघंची परिसरात शेतीचा मशागत खर्च वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:28 AM2021-05-27T04:28:03+5:302021-05-27T04:28:03+5:30

दिघंची : डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या भाड्यात ट्रॅक्टर चालकांनी वाढ केली आहे. यामुळे दिघंची (ता. आटपाडी) येथील शेतकऱ्यांचा मशागतीचा ...

The cost of farming increased in Dighanchi area | दिघंची परिसरात शेतीचा मशागत खर्च वाढला

दिघंची परिसरात शेतीचा मशागत खर्च वाढला

Next

दिघंची :

डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या भाड्यात ट्रॅक्टर चालकांनी वाढ केली आहे. यामुळे दिघंची (ता. आटपाडी) येथील शेतकऱ्यांचा मशागतीचा खर्च ३० टक्क्यांनी वाढला आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे.

दिघंचीसह पांढरेवाडी, पुजारवाडी, उंबरगाव, लिंगीवरे, राजेवाडी, नळमळा, मानेमळा आदी ठिकाणी शेतकरी बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरचा मशागतीसाठी वापर करीत आहेत. डिझेलच्या दरात वाढ होत असल्यामुळे मशागतीच्या खर्चात वाढ केल्याचे ट्रॅक्टर चालक सांगत अहेत. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची मशागत परवडत नाही, असे दिसत आहे. दिघंची परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे रब्बीची पिके जोमात आली होती. खरीप हंगामही चांगला जाईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कोरोनामुळे चांगला हमीभावही मिळाला नाही. पावसाळ्याचे दिवस तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची मशागत सुरू केली आहे. दिघंची परिसरात बैलजोडीचा अभाव असल्याने बळीराजा ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करीत आहे.

खरीप हंगाम जवळ आला असून शेतकऱ्यांच्याजवळ पैसा नसल्याने आर्थिक चणचण भासत आहे. तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, वखरणी आदी कामांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. खते, बी-बियाणे आणण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत तर शेण खताचाही खर्च वाढल्याने मशागतीसाठी व खतासाठी पैसा कोठून आणायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे

चौकट

कष्टाने पिकविलेल्या मालाला चांगला हमीभाव मिळत नाही. कामासाठी मजूरही मिळत नाहीत. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ट्रॅक्टरचे भाडेही वाढले आहे. खते, बी-बियाणांच्या किमतीतही वाढ होत आहे. शेण खतांच्या किमतीतही वाढ झाली असल्याने शेतीत उत्पन्न कमी व खर्च अधिक होत असून शेतीसाठी पैसा कोठून आणायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे

- शहाजी पवार, शेतकरी पवारमळा - पांढरेवाडी

डिझेलच्या दरात वाढ झाल्याने नांगरणी, वखरणी आदी मशागतीची कामे करण्यासाठी भाडे परवडेना झाल्याने ट्रॅक्टरच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे

- भावड्या मोरे, ट्रॅक्टर मालक भवानीमळा

ट्रॅक्टर वखरणीचे दर प्रतिएकर

नांगरणी २७०० ते ३०००

वखरणी ९०० ते १०००

रोटावेटर २००० ते २२००

ट्रॅक्टर वखरणीचे दर प्रतितास

नांगरणी ९०० ते १०००

वखरणी ८०० ते ९००

रोटावेटर ९०० ते १०००

शेणखत ५५०० ते ६००० ट्रॉली

Web Title: The cost of farming increased in Dighanchi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.