मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी परिषद की पाठशाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:21+5:302021-07-14T04:30:21+5:30
हरीपूर येथे विद्यार्थी परिषदेच्या परिषद की पाठशाला उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेले ...
हरीपूर येथे विद्यार्थी परिषदेच्या परिषद की पाठशाला उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेले दीड वर्ष विद्यार्थी मानसिकदृष्ट्या कोरोनाच्या दहशतीत होते. त्यातून बाहेर काढण्यासाठी विद्यार्थी परिषदेने ‘परिषद की पाठशाला’ उपक्रम राबविला. १ ते ९ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क शिकवणी वर्ग व मार्गदर्शन शिबिरे घेतली.
पाचवीपासूनच्या वर्गांना गणित, भूगोल, मराठी, व्यक्तिमत्त्व विकास, परिसर ओळख अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. बालवाडी ते चौथीतील वयोगटाला गाणी, खेळ, बोधकथा या मार्गाने शैक्षणिक प्रवाहात कायम ठेवले. सांगलीत गावभागात, हरिपूर, मिरज, विश्रामबाग, कुपवाड, माधवनगर, कवठेपिरान, तासगाव, शिरोळ आदी बारा ठिकाणी ‘परिषद की पाठशाला’ उपक्रम राबवण्यात आला. उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी या मुलांना धडे दिले.
या उपक्रमासाठी जिल्हाप्रमुख प्रा. गुरू वाणी, जयदीप पाटील, ऋषिकेश पाटील, दया उगले, माधुरी लड्डा, बाहुबली छत्रे, ऋषिकेश पोतदार, प्रा. सुभाष मालगावे, विशाल जोशी, अनुश्री विसपुते, ओंकार पाटील, बागेश्री उपळावीकर, सुप्रिया पाटील, सत्यजित राजोपाध्ये, रोहन कोडोले, ऋतुजा कोडोले, शुभम आरवत्तू, प्रथमेश जाधव, रोहन भोरावत, प्रियांका माने, प्राजक्ता वाणी, कोमल माने, दर्शन मुंदडा, ऋतुजा वारद, शांभवी धामणीकर, चैत्राली कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.