थाटामाटात घातलं गाईचं डोहाळ जेवण, सांगलीतील कडेपुरात चर्चेचा विषय

By उद्धव गोडसे | Published: February 15, 2023 06:08 PM2023-02-15T18:08:57+5:302023-02-15T18:09:17+5:30

कडेगाव : हौसेला मोल नाही म्हणतात... या विधानाचा प्रत्यय कडेपूर (ता. कडेगाव) येथे आला. येथील शेतकरी किरण लालासो यादव ...

Cow dhow meal served in a show Kadepur in Sangli | थाटामाटात घातलं गाईचं डोहाळ जेवण, सांगलीतील कडेपुरात चर्चेचा विषय

थाटामाटात घातलं गाईचं डोहाळ जेवण, सांगलीतील कडेपुरात चर्चेचा विषय

Next

कडेगाव : हौसेला मोल नाही म्हणतात... या विधानाचा प्रत्यय कडेपूर (ता. कडेगाव) येथे आला. येथील शेतकरी किरण लालासो यादव यांनी मोठ्या उत्साहात त्यांच्या आनंदी गाईचे डोहाळ जेवण घातले. या उपक्रमाने कृषी संस्कृतीमधील देशी गायीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न. अनोख्या डोहाळ जेवणासाठी संपूर्ण गावासह पै-पाहुण्यांनी हजेरी लावली. थाटामाटात झालेले गाईचे डोहाळ जेवण कडेपूर पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले.

खिलार प्रजातीच्या गायींची संख्या पुन्हा वाढावी यासाठी अनेक शेतकरी आणि गोप्रेमी प्रयत्न करीत आहेत. कडेपूर येथील किरण यादव यांच्या घरात पूर्वापार देशी गाईंचे पालन केले जाते. त्यांनी गेल्या वर्षी एक नवीन गाय खरेदी केली. आनंदाने तिचे नाव आनंदी असे ठेवले. शेतकऱ्याच्या दारातील समृद्धीचे प्रतीक असलेल्या गाईचे डोहाळ जेवण मोठ्या थाटामाटात करण्याचा निर्णय यादव कुटुंबीयांनी घेतला.

त्यानुसार मंगळवारी डोहाळ जेवणाचे आयोजन केले होते. डोहाळ जेवणासाठी गाईला सजवले होते. अंगावर झूल, रंगविलेली शिंगे, शिंगांना बांधलेले गोंडे, गळ्यात घुंगुरमाळा, पायात तोडे घातलेली गाय सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. गाईसाठी स्वतंत्र मंडप घातला होता, तसेच तिच्या डोहाळ जेवणाचे फलकही गावात झळकले.

गायीसमोर हिरव्या-सुक्या चाऱ्यासह अनेक पदार्थांची रेलचेल होती. महिलांनी गाईला पंचारतीने ओवाळून पूजन केले. अनेकांनी तिला गोग्रास भरवला, तर तिचे ओटीपूजन करून फोटोसेशनही झाले. कृषी संस्कृती आणि देशी गायी बद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाला कडेपूरसह परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थिती लावली. तसेच एक हजाराहून जास्त लोकांच्या पंगती उठल्या. कृषी संस्कृतीतील देशी गाईचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी रात्री कीर्तनाचेही आयोजन केले होते. हे अनोखे डोहाळ जेवण कडेपूर पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले.

Web Title: Cow dhow meal served in a show Kadepur in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली