ऐन उन्हाळ्यात गाईचे दूध दर पडले, मंदीची शक्यता; पावसाळ्यात पुन्हा दर कमी होणार

By श्रीनिवास नागे | Published: May 9, 2023 03:23 PM2023-05-09T15:23:52+5:302023-05-09T15:24:04+5:30

दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी उन्हाळा उत्तम काळ समजला जातो.

Cow milk prices fell in summer, recession likely; The rate will decrease again during the rainy season | ऐन उन्हाळ्यात गाईचे दूध दर पडले, मंदीची शक्यता; पावसाळ्यात पुन्हा दर कमी होणार

ऐन उन्हाळ्यात गाईचे दूध दर पडले, मंदीची शक्यता; पावसाळ्यात पुन्हा दर कमी होणार

googlenewsNext

देवराष्ट्रे (जि. सांगली) : उन्हाळ्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना मोठ्या दूध संघांनी गाईच्या दूध खरेदी दरात एक रुपयाची कपात केल्याने उत्पादक धास्तावला आहे. पावडरीचे दरही कमी झाल्याने पुढील काही महिन्यांत या व्यवसायात मंदीची शक्यता व्यक्त होत आहे.

दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी उन्हाळा उत्तम काळ समजला जातो. या काळात उत्पादक व दूध संघांना चांगला नफा मिळत असतो. उन्हाळ्यात दर वाढतात. मात्र यावर्षी प्रथमच ऐन उन्हाळ्यात गाईच्या दूध खरेदी दरात संघांनी एक रुपयाची कपात केली आहे. पावसाळ्यात व हिवाळ्यातही मागणी घटल्यास दुधाचे भाव आणखी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरीचे भाव किलोमागे २० ते ते ३० रुपये कमी झाल्यामुळे दूध दरात कपात केल्याचे दूध संघांकडून सांगितले जात आहे. महागाईच्या तडाख्यात हतबल झालेला शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहत असतो. दुधाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून गाई व म्हैशींची खरेदी केली आहे. तथापि दूध उत्पादनासाठी लागणारा चारा, पशुखाद्य, मजूर, पशुवैद्यकीय डॉक्टर यांचा खर्च अमाप वाढला आहे. त्यामुळे दूध दर कमी झाल्याचा फटका उत्पादकांना बसणार आहे.

कर्नाटकच्या धर्तीवर प्रतिलिटर अनुदान हवे

दुधाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्नाटकच्या धर्तीवर प्रतिलिटर अनुदान दिले पाहिजे. अनुदान असेल तर दूध दर पडले तरी त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार नाही.

Web Title: Cow milk prices fell in summer, recession likely; The rate will decrease again during the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.