Sangli News: शेततळ्यात गव्याने घेतला वॉटरपार्कचा आनंद, मनसोक्त केले स्वीमिंग -video

By संतोष भिसे | Published: March 13, 2023 06:55 PM2023-03-13T18:55:03+5:302023-03-13T19:18:29+5:30

ऊसपट्ट्यात आढळणारा गवा दुष्काळी शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा ठरला, पण त्यांनी कोणताही अतिउत्साह न दाखवता गव्याला त्याच्या मार्गाने जाण्यास मोकळीक दिली

Cows enjoyed the waterpark in the farm, enjoyed swimming in Sangli | Sangli News: शेततळ्यात गव्याने घेतला वॉटरपार्कचा आनंद, मनसोक्त केले स्वीमिंग -video

Sangli News: शेततळ्यात गव्याने घेतला वॉटरपार्कचा आनंद, मनसोक्त केले स्वीमिंग -video

googlenewsNext

सांगली : रणरणत्या उन्हात तो आला, त्यानं शेततळं पाहिलं आणि थेट पाण्यात उडी घेतली. मनसोक्त स्वीमिंग केलं, आणि आल्यापावली परतला. गेल्या तीन दिवसांत तासगाव, कवठेमहांकाळ व जतच्या दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्यांना दर्शन दिलेल्या गव्याने डोंगरसोनी (ता. तासगाव) येथे शेततळ्यात यथेच्छ डुंबण्याचा मुक्त आनंद लुटला.

मंगळवेढ्याकडून जत तालुक्यात शिरलेल्या गव्याने कुंभारीतून कवठेमहांकाळकडे कूच केले. यादरम्यान अनेकांना तो दिसला. कोणालाही उपद्रव मात्र केला नाही. लोकांनी कळवल्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी त्याच्या मागावर राहिले. पाच-सात द्राक्षबागांतून घुसला, पण बागेची नासधूस केली नाही. एरवी ऊसपट्ट्यात आढळणारा गवा दुष्काळी शेतकऱ्यांसाठी कुतुहलाचा ठरला, पण त्यांनी कोणताही अतिउत्साह न दाखवता गव्याला त्याच्या मार्गाने जाण्यास मोकळीक दिली. त्यामुळे त्याचा प्रवास शांतपणे सुरु राहिला.

रणरणत्या उन्हात त्याने शनिवारी डोंगरसोनीमध्ये (ता. तासगाव) प्रवेश केला. तेथे विजय झांबरे या शेतकऱ्याच्या शेततळ्याने त्याला मोहवले. डोक्यावर कडक उन्हे आणि समोर थंडगार पाणी पाहून राहवले नाही. तळ्यातील थंडगार पाणी पिले. लोकांना न जुमानता थेट तळ्यात उडी घेतली. मनसोक्त स्नान केले. त्यानंतर आपल्याच मस्तीत थंडावलेल्या अंगाने तळ्यातून बाहेर पडला.

झांबरे यांनी मोबाईलमध्ये त्याच्या स्विमिंगचे चित्रण केले. तळ्याच्या कागदावरुन बाहेर पडणे त्याला काहीसे मुश्किल झाले, पण वजनदार देहामुळे आधार मिळत गेला. कागद फाटण्याची किंवा तळ्याच्या नासधुशीची चिंता झांबरे यांना होती, पण तसे काही झाले नाही. रविवारी गवा मंगळवेढ्याकडे परतीच्या मार्गावर गेल्याचे लोकांनी पाहिले.

Web Title: Cows enjoyed the waterpark in the farm, enjoyed swimming in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली