योजनांच्या माहितीसाठी केंद्र निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:26 AM2021-05-18T04:26:28+5:302021-05-18T04:26:28+5:30
------------- डासांचा प्रादुर्भाव आष्टा : शहरातील अनेक भागात गटारी तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ...
-------------
डासांचा प्रादुर्भाव
आष्टा : शहरातील अनेक भागात गटारी तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नियमित डास प्रतिबंधक औषध फवारणीची मागणी केली जात आहे.
--------------
बांधकामाचा खर्च वाढला
मिरज : गेल्या दोन वर्षांपासून सळी, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड वधारले आहेत. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीवर वाढला आहे.
------------
पशू योजनांबाबत जनजागृती करा
जत : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे.
-------------------
लघुव्यावसायिक आर्थिक संकटात
मिरज : शहरात शेकडो लघुव्यावसायिक अनेक वर्षांपासून व्यवसाय करून कुटुंब चालवत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे यावर्षी त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लघुव्यवसाय करणाऱ्यांची दैनंदिन आवक रोजच्या आर्थिक घडामोडींवर अवलंबून असते. मात्र, कोरोनामुळे सर्व व्यवहार डबघाईस आले आहेत.
----------------
जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
कुपवाड : मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मोकाट श्वान दुचाकीमागे धावतात. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
----------
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
सांगली : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावांत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अनेक विद्युततारा लोंबकळत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युतपुरवठा खंडित होतो. याकडे महावितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
---------
निराधारांची प्रकरणे मार्गी लावा
सांगली : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींची प्रकरणे तातडीने निकाली काढून जिल्ह्यातील लाभार्थींना न्याय देण्याची मागणी लाभार्थींनी केली आहे. काेराेना संचारबंदीमुळे कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती असल्याने विलंब हाेत आहे.
-------------
प्लॅस्टिकमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
मिरज : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लॅस्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.