वास्तवातून सृजनशील साहित्याची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:18 AM2021-02-05T07:18:08+5:302021-02-05T07:18:08+5:30
भिलवडी : वाचकाला अंतर्मुख व अस्वस्थ करणारे साहित्य सर्वाधिक गुणात्मक असते. विचारांचा वसा घेऊन व्रतस्थपणे वास्तवाला भिडल्याशिवाय सृजनशील साहित्याची ...
भिलवडी : वाचकाला अंतर्मुख व अस्वस्थ करणारे साहित्य सर्वाधिक गुणात्मक असते. विचारांचा वसा घेऊन व्रतस्थपणे वास्तवाला भिडल्याशिवाय सृजनशील साहित्याची निर्मिती होत नाही,, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले.
भिलवडी (ता. पलूस) येथे सुभाष कवडे लिखित ‘जांभळमाया’ या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. उद्योगपती गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली होते. वैजनाथ महाजन व प्रा. प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले की, मराठी साहित्यात शिक्षक साहित्यिकांनी लेखनाची मोठी परंपरा निर्माण केली. सुभाष कवडे हे साहित्य क्षेत्रातील आनंदयात्री आहेत. ते समाजासाठी जे स्वीकार्य आहे तेच सकारात्मकरीत्या मांडतात. त्यांचे पुस्तक प्रकाशित होणं हा आत्मिक आनंदाचा भाग आहे. उद्योजक गिरीष चितळे म्हणाले की, ‘जांभळमाया’ हे पुस्तक आत्मिक समाधानाबरोबर अनुभव विश्व ही जागृत करते.
सुभाष कवडे यांच्या संघर्षाचे सार म्हणजे जांभळमाया, असे प्रतिपादन कवी प्रदीप पाटील यांनी केले.
अमरसिंह देशमुख यांनी माणदेशातील तत्कालीन परिस्थितीचे व संघर्षाचे चित्रण लेखणात उतरल्याचे नमूद केले, त्याचसोबत "व्यक्त व्हा व अधिकाधिक लिहते व्हा" असा संदेश त्यांनी आपल्या भाषणात दिला.
विठ्ठल मोहिते यांनी प्रास्ताविक व स्वागत, शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डी. आर. कदम यांनी आभार मानले. यावेळी प्रा. संजय ठिगळे, शाहीर पाटील, जी. जी. पाटील, ए. के. चौगुले, भू. ना. मगदूम, रमेश पाटील, पुरुषोत्तम जोशी, महावीर वठारे, हणमंत डिसले आदी उपस्थित होते.
फोटो-३१भिलवडी१
फोटो ओळ - भिलवडी (ता. पलुस) येथे ‘जांभळमाया’ या पुस्तकाचे प्रकाशन गिरीश चितळे, अमरसिंह देशमुख, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. प्रदीप पाटील, सुभाष कवडे यांच्या हस्ते करण्यात आले.