लातूरच्या पाण्याचे श्रेय सरकारला

By Admin | Published: April 19, 2016 11:54 PM2016-04-19T23:54:18+5:302016-04-20T00:33:51+5:30

मकरंद देशपांडे : राज्यकर्त्यांची संवेदनशीलता, प्रशासकीय तत्परतेचे यश

The credit of Latur water is to the government | लातूरच्या पाण्याचे श्रेय सरकारला

लातूरच्या पाण्याचे श्रेय सरकारला

googlenewsNext

प्रश्न : मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची कल्पना कशी सुचली?
उत्तर : पाणी हा माझा आवडीचा विषय आहे. महापालिका सदस्य असताना मी वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी वारंवार महासभेत वॉटर आॅडिटचा विषय मांडला. मिरजेतील गणेश तलावातील गाळ काढण्यासाठीही पाठपुरावा केला. स्थायी समिती सभापती असताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या जलशुध्दीकरण के ंद्राची क्षमता दुप्पट केली. मिरजेतील ओढापात्राची सफाई करून ओढा पुनरुज्जीवनाच्या कामात माझा सहभाग आहे. तीव्र पाणीटंचाई असल्याने लातूरला उजनीचे पाणी पंढरपुरातून देण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र रेल्वे टँकरपर्यंत पाणी नेण्याची यंत्रणा नसल्याने लातूरला पाणी देणे अशक्य असल्याबाबतची बातमी ‘लोकमत’मध्ये वाचली. मिरज रेल्वे स्थानकासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यासाठी पाठपुरावा केला असल्याने मिरजेतून रेल्वेच्या यंत्रणेद्वारे पाणी देता येईल, हा प्रस्ताव मी नाशिक येथे पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. मुख्यमंत्र्यांनीही माझ्या सूचनेस चांगला प्रतिसाद देऊन, महसूलमंत्री एकनाथ खडसे व लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना मिरजेत पाहणीसाठी पाठविले. त्यांनी तातडीने निर्णय घेतल्याने प्रशासकीय यंत्रणेने १८ महिन्यांचे काम दहा दिवसात पूर्ण केले व लातूरला पाणी पुरवठा सुरू झाला.
प्रश्न : सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई असताना लातूरला पाणी देणे कितपत योग्य आहे?
उत्तर : कोयना धरणात ३८ टक्के, वारणा धरणात १५ टीएमसी पाणीसाठा असल्याने आपल्याकडे सुदैवाने पाणीटंचाई नाही. ताकारी, टेंभू, म्हैसाळ या सिंचन योजनांमुळे शेतीला पाणी सुरू आहे. पिण्याच्या पाण्याची अजिबात टंचाई नाही. जिल्ह्यात जेथे पाणीटंचाई आहे, तेथे प्रशासनाने टँकरसह अन्य उपाययोजना केल्या आहेत. जेथे दुष्काळ असेल, तेथे दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्यासाठी भाजप कार्यकर्ते तयार आहेत. आपल्याकडे पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने लातूरला पाणी देण्यास काहीही अडचण नाही.
प्रश्न : लातूरला पाणी देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी विरोध केला होता?
उत्तर : पिण्याचे पाणी पुरविण्याबाबत कोणीही राजकारण करू नये. लातूरला पाणी पुरवण्यास विरोध करणाऱ्या मंडळींचे गैरसमज दूर केले आहेत. स्थानिक नागरिकांना पाण्याचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी घेऊन पाणी कोठेही पाठविता येईल. उत्तर : यास विरोध करणे केवळ स्टंटबाजी होती. माजी मंत्री पतंगराव कदम, जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी लातूरला पाणी पुरविण्यास पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षांचा केवळ विरोधासाठी विरोध आहे.
प्रश्न : लातूरला पाणी पुरवठ्याचे श्रेय कोणाला आहे?
उत्तर : राज्यकर्त्यांची संवेदनशीलता व प्रशासकीय अधिकाऱ्यांची तत्परता यामुळे लातूरला रेल्वेने पाणी पोहोचले. याचे श्रेय भाजप सरकारला द्यावे लागेल. कोणा एकाचे किंवा माझे श्रेय नाही. म्हैसाळ योजनेलाही युती शासनाच्या काळात गती मिळाली होती. टंचाईग्रस्तांना पाणी देण्याबाबत आमचे शासन संवेदनशील आहे.
प्रश्न : म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे भरावे लागतात. लातूरला पाणी पुरवण्यासाठी मात्र टंचाई निधीतून खर्च करण्यात येतो.
उत्तर : म्हैसाळ योजनेतून यापूर्वी तीनवेळा टंचाई निधीतून वीजबिल भरून पाणी सोडण्यात आले आहे. १४ कोटी थकित वीजबिलापैकी केवळ पाच कोटी रुपये भरण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. त्यापैकी केवळ तीन कोटी भरल्यानंतर म्हैसाळचे पंप सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरून पाहिजे तेव्हा पाणी घेण्याची सवय लागावी, हा उद्देश आहे. लातूरला पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने तेथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. पिण्याच्या व शेतीच्या पाण्यात फरक आहे. लातूरला पाणी पुरवठ्याची उपाययोजना अपवादात्मक व तात्पुरती आहे. लातूरचा पाणीपुरवठा व म्हैसाळ योजनेचे शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी याची तुलना अनावश्यक आहे.
- सदानंद औंधे

लातूरच्या दुष्काळाच्या कथा राज्यभर चर्चेला आल्या. पाण्याच्या स्त्रोतांची असलेली मर्यादा...पूर्ण उन्हाळा काढण्याच्या विचाराने पसरलेला अंधार...या गोष्टींच्या वेदना मिरजकरांनाही झाल्या. लातूरकरांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची संधी मिरजकरांना मिळाली. मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणी देता येऊ शकते, ही गोष्ट भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून पाठपुरावा केला. या सर्व प्रक्रियेविषयी आणि त्यातून उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीविषयी त्यांच्याशी केलेली बातचित...

Web Title: The credit of Latur water is to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.