गुंड छोट्या बाबरसह १७ जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Published: April 28, 2017 11:53 PM2017-04-28T23:53:33+5:302017-04-28T23:53:33+5:30

गुंड छोट्या बाबरसह १७ जणांविरुद्ध गुन्हा

Crime against 17 people with Babul | गुंड छोट्या बाबरसह १७ जणांविरुद्ध गुन्हा

गुंड छोट्या बाबरसह १७ जणांविरुद्ध गुन्हा

Next


सांगली : येथील शंभरफुटी रस्त्यावरील वैशाली संभाजी पाटील (वय ३२) या महिलेस दमदाटी करून तिच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याप्रकरणी गुंड छोट्या बाबरसह १५ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात छोट्या बाबर गटातील गणेश मोरे यास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध, अशा एकूण १७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यातील चौघांना ताब्यात घेतले आहे.
वैशाली पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, छोट्या ऊर्फ विक्रांत बाबर, गणेश मोरे, सोनू जगदाळे, रोहित बाबर, आशा जाधव, सुजाता मोरे व दहा ते पंधरा अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंद आहे. गणेश मोरे याच्या फिर्यादीवरुन संभाजी मस्के-पाटील (रा. आरवडे, ता. तासगाव), वैशाली ढसाळ-बागडी (रा. शंभरफुटी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीधर अशोक जगदाळे, रोहित रमेश बाबर, गणेश सुरेश मोरे व सुजाता दत्ता बिरजगे (सर्व रा. सांगली) यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. २३ एप्रिलला रात्री अकरा वाजता ही घटना घडली आहे, पण घटनेनंतर दोन दिवसांनी दोन्ही गटाने शहर ोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
वैशाली पाटील यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, छोट्या बाबर व त्याचे साथीदार २३ रोजी रात्री साडेअकराला पाटील यांच्या घरासमोर गेले. त्यांनी वैशाली यांना ‘तुझ्या पतीला आमच्यासमोर हजर कर, नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या अंगावरील तीस हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच घराजवळ तीन दुचाकी उभ्या होत्या. या दुचाकींवर दगडफेक करुन त्यांची मोडतोड केली.
गणेश मोरे याच्या फिर्यादीत म्हटले आहे की, २३ रोजी रात्री अकराला गणेश हा वाळवेकर रुग्णालयाजवळ उभा होता. त्यावेळी पाठीमागून वैशाली ढसाळ बागडी व संभाजी मस्के-पाटील हे दोघे आले. त्यांनी पूर्वीच्या भांडणातून गणेशच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून पलायन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against 17 people with Babul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.