होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या २७४ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:11+5:302021-04-24T04:27:11+5:30

सांगली : कोरोनाचे निदान झाल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये थांबणे आवश्यक असताना बाहेर फिरणाऱ्या २७४ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ...

Crime against 274 people for violating home isolation rules | होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या २७४ जणांवर गुन्हा

होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या २७४ जणांवर गुन्हा

Next

सांगली : कोरोनाचे निदान झाल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये थांबणे आवश्यक असताना बाहेर फिरणाऱ्या २७४ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यापुढेही होम आयसोलेशनचे नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिला आहे.

कोरोनाचे निदान झाल्यानंतर सौम्य लक्षणे असलेल्या अनेकांना घरातच थांबून उपचार केले जात आहेत. मात्र, यातील अनेकजण नियमांचे पालन करता, बाहेर फिरत असल्याचे दिसून आल्याने आता पोलिसांनी गस्त चालू केली आहे. त्यात होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णाच्या घरी कर्मचारी भेट देऊन माहिती घेत आहेत. त्यात नियमाचा भंग आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.

जिल्ह्यात सांगली ग्रामीण भागात ४, इस्लामपूर ८८, आष्टा ३२, विश्रामबाग २, कुरळप १७

पलूस १६, कुंडल १, भिलवडी ९, कडेगाव १०, शिराळा ३६, कासेगाव २०, तासगाव ७, विटा ८ आणि कवठेमहांकाळ १ अशा २७४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलिसांकडून कोरोनाबाधित आढळलेल्या व होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णाच्या घरासमोर गस्त सुरू असल्याने कोणीही नियम मोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Crime against 274 people for violating home isolation rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.