कुपवाडमध्ये पाच भाजी विक्रेत्यांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:05+5:302021-07-31T04:27:05+5:30
कुपवाड : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून भाजी मंडईतील पाच विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुभाष ...
कुपवाड : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून भाजी मंडईतील पाच विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुभाष सदाशिव आडगळे (वय ५३, रा. देशभक्त आर. पी. पाटील चौक, कुपवाड), अनिता अमोल जमदाडे (३५), विलासमती बाळासाहेब पाटील (५६, दोघीही रा. कवठेकर गल्ली, कुपवाड), फातिमा खुद्दबुद्दीन मुलाणी (५९, रा. भाजी मंडई, कुपवाड), बेबी दावल मुल्ला (३९, रा. कुपवाड) अशी गुन्हे दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
जिल्हा प्रशासनाने भाजीपाला, फळ इतर विक्रेत्यांना कोरोना कालावधीत मालाची विक्री करण्यासाठी नियम जाहीर केले आहेत. शहरातील देशभक्त आर. पी. पाटील चौकातील भाजी मंडईतील विक्रेते गुरुवारी संध्याकाळी जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून भाजी विक्री करीत असल्याचे कुपवाड पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.