सांगलीत धारदार चाकूने केक कापणाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:30+5:302021-03-06T04:25:30+5:30
सांगली : शहरात बंदी आदेश असतानाही अलिशान चौक परिसरात धारदार चाकूने केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर ...
सांगली : शहरात बंदी आदेश असतानाही अलिशान चौक परिसरात धारदार चाकूने केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर शहर पाेलिसांनी कारवाई केली. मोहसीन उर्फ चपट्या बबल्या नूरमोहम्मद शेख (वय २५, रा. सातवी गल्ली, नुराणी मोहल्ला) आणि आस्लम दावलसाब मु्ल्ला (वय ३२, रा. अलिशान चौक, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सध्या बंदी आदेश लागू आहेत. शहरातील अलिशान चौकात आस्लम मुल्ला याच्या वाढदिवसानिमित्त केक आणून तो धारदार चाकूने कापून दोन्ही संशयितांनी याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी दोघांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विक्रम खोत यांनी फिर्याद दिली आहे.