मिरजेत कोविड रुग्णालयाची तोडफोड केल्याबद्दल तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:11+5:302021-05-05T04:43:11+5:30
रविवारी मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयाची तोडफोड करून नुकसान करण्यात आले हाेते. याप्रकरणी रुग्णालयातील लेखाधिकारी निशा अमित पाटील यांनी कृष्णा ...
रविवारी मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयाची तोडफोड करून नुकसान करण्यात आले हाेते. याप्रकरणी रुग्णालयातील लेखाधिकारी निशा अमित पाटील यांनी कृष्णा परशुराम घुले (रा. महावीरनगर, पंढरपूर, जि. सोलापूर), राजू जाधव (वय ३५, रा. सांगली) व अन्य अनोळखी एक अशा तिघांविरुद्ध गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पंढरपूर येथील तिघांना कोरोना उपचारासाठी अॅपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी शनिवारी एका वृद्धेचा मृत्यू झाला. अन्य दोघांवरील उपचाराचे २ लाख रुपये बिल झाले असून रक्कम तात्काळ भरा, असे नातेवाइकांना सांगण्यात आले. त्यावेळी घुले व जाधव याच्यासह तिघांनी ‘आमचे एवढे बिल कसे झाले?’ असा जाब विचारत रुग्णालयाच्या मुख्य दरवाजाची काच, बायेमेट्रिक थम्ब मशीन, ४ मिनी व्हेंटिलेटर, बायपॅप मशीन मॉनिटर या साहित्याची तोडफोड करून दोन लाखांचे नुकसान केल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गांधी चौक पोलिसांत नोंद आहे.