पांडोझरीतील एकावर सावकारी व ॲट्रसिटीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:36+5:302021-02-05T07:19:36+5:30

पांडोझरी येथील मुकेश केंगार हा ऊसतोडणी कामगार आई, वडील, पत्नी यांच्यासोबत राहातो. दोन वर्षांपूर्वी त्याने उसतोडणीसाठी टोळी करण्याकरिता गावातील ...

Crime of lending and atrocity on one of the Pandozari | पांडोझरीतील एकावर सावकारी व ॲट्रसिटीचा गुन्हा

पांडोझरीतील एकावर सावकारी व ॲट्रसिटीचा गुन्हा

Next

पांडोझरी येथील मुकेश केंगार हा ऊसतोडणी कामगार आई, वडील, पत्नी यांच्यासोबत राहातो. दोन वर्षांपूर्वी त्याने उसतोडणीसाठी टोळी करण्याकरिता गावातील एका व्यक्तीला पैसे दिले होते. मात्र त्याच्याकडून उसतोडीसाठी मंजूर मिळाले नाहीत. तसेच पैसही मिळाले नाहीत. मात्र मुकेश केंगार याला कारखानदार पैसे देणे आवश्यक होते. त्यामुळे त्याने कारखानदारास पैसे देण्याकरिता ग्रामपंचायत हद्दीत बांधलेले घर दोन वर्षांकरिता आप्पासाहेब बिराप्पा व्हणमाने यांना चार पंचासमोर स्टॅम्प पेपरवर करार करून त्याच्याकडून तीन लाख २५ हजार रुपये घेतले होते.

महिन्यापूर्वी मुकेश केंगार हा संबंधित पंच लोकांना घेऊन व्याजासह पैसे परत करण्यास गेला असता बिराप्पा व्हणमाने यांनी घर परत देण्यास नकार देत जातिवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे मुकेश केंगार व त्यांच्या परिवारातील व्यक्तींनी उमदी पोलीस ठाण्यात व्हणमाने यांच्या विरोधात फिर्याद दिली. यानुसार आप्पासाहेब व्हणमाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले करीत आहेत.

Web Title: Crime of lending and atrocity on one of the Pandozari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.