विनयभंगप्रकरणी शाळेतील काैन्सिलरवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:25 AM2021-03-18T04:25:50+5:302021-03-18T04:25:50+5:30
कुपवाड : मिरज तालुक्यातील एका इंग्लिश मिडीयम स्कूलमधील शिक्षिकेचा शाळेतील कौन्सिलरने विनयभंग केला. तसेच संस्थेचे संचालक व प्राचार्य या ...
कुपवाड : मिरज तालुक्यातील एका इंग्लिश मिडीयम स्कूलमधील शिक्षिकेचा शाळेतील कौन्सिलरने विनयभंग केला. तसेच संस्थेचे संचालक व प्राचार्य या दोघांनी तिला जातीवाचक शब्द वापरून अपमान केल्याची तक्रारही संबंधित महिलेने कुपवाड पोलिसात दिली आहे. त्यानुसार संशयित कौन्सिलर विजय गिते, संचालक प्रदीप खांडवे, प्राचार्य अल्फोन्सा लाॅरेन्स यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
एका इंंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये १२ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत शाळेतील संशयित कौन्सिलर विजय गिते यांनी एका शिक्षिकेचा विनयभंग केला आहे. यााबाबतची तक्रार पीडित शिक्षिकेने संस्थेचे संचालक प्रदीप खांडवे व प्राचार्य अल्फोन्सा लाॅरेन्स यांच्याकडे केली.
यावेळी खांडवे व लाॅरेन्स यांनी शिक्षिकेलाच जाब विचारुन जातीवाचक शब्द वापरून तिचा अपमान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानुसार पोलिसांनी संशयित तीनजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात भेट देऊन पीडित शिक्षिकेची तक्रार ऐकून घेतली आहे. संशयितावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी कुपवाड एमआयडीसी पोलिसांना दिले आहेत.