मारहाणप्रकरणी शिवेंद्रसिंहराजेंवर गुन्हा

By admin | Published: February 20, 2017 11:48 PM2017-02-20T23:48:17+5:302017-02-20T23:48:17+5:30

मेढा पोलिस ठाणे : तीस ते पस्तीस कार्यकर्त्यांविरुद्धही तक्रार

Criminal crime in Shivendra Singh | मारहाणप्रकरणी शिवेंद्रसिंहराजेंवर गुन्हा

मारहाणप्रकरणी शिवेंद्रसिंहराजेंवर गुन्हा

Next



मेढा : जावळी तालुक्यातील पावशेवाडी बामणोली येथे रविवार, दि. १९ रोजी मध्यरात्री १२ ते १२:३० च्या दरम्यान कोणतेही कारण नसताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या सुमारे ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी मारहाण करून चारचाकी गाडीचे नुकसान केल्याची फिर्याद मेढा पोलिस ठाण्यात आयुब शमसुद्दीन पठाण (वय २४, रा. सातारा) यांनी दिली असून, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ३० ते ३५ जणांच्याविरुद्ध मेढा पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, फिर्यादी हा कुसुंबी गटातील भाजपाच्या उमेदवार मनाली शेलार यांच्या गाडीवर ड्रायव्हर असून, त्याच्यासह आणखी चार ते पाचजणांना मारहाण करण्यात आल्याचे समजते.
याबाबत आयुब पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी रात्री १२ ते १२:३० च्या दरम्यान पावशेवाडी-बामणोली गावानजीक असलेल्या दंडवस्तीत आयुब पठाण व जयेश देशमुख, आनंद शिंदे वगैरे चार ते पाचजण तंबाखू घेण्यासाठी थांबले असताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे गाडीतून जात होते. त्यावेळी त्यांनी गाडी थांबवून गाडीतून खाली उतरले व आयुब पठाण यास नाव, गाव विचारून कोणतेही कारण नसताना कानशीलात दिली. यावेळी आमदार भोसले यांच्याबरोबर असलेल्या ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पठाण यांचेकडे असलेल्या चारचाकी गाडीचे नुकसान केले.
याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व ३० ते ३५ जणांविरुद्ध मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
याप्रकरणी कुसुंबी गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना रांजणे यांचे पती ज्ञानदेव रांजणे, राजू भोसले, यशवंत आगुंडे आदी घटनास्थळी असल्याचे फिर्यादीने सांगितले. दरम्यान, याप्रकरणी मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बी. आर. झांजुर्णे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
खासदारांचा मध्यरात्री ठाण्यात ठिय्या
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रविवारी रात्री २ वाजल्यापासून सुमारे ४०० ते ५०० लोकांचा जनसमुदाय पोलिस ठाण्यात जमला होता. खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार सदाशिव सपकाळ, अमित कदम, विजय शेलार आदीजण रात्री २ ते पहाटे ६ पर्यंत मेढा पोलिस ठाण्यात ठिय्या ठोकून होते.

Web Title: Criminal crime in Shivendra Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.