महामार्गाच्या दुर्दशेची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल - लोकमतचा प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:44 AM2018-08-26T00:44:58+5:302018-08-26T00:49:48+5:30
महापालिका क्षेत्रातील बाहेरून येणाºया महामार्गाच्या दुर्दशेबद्दल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाºयांबरोबर याबाबत चर्चा करून आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले
सांगली : महापालिका क्षेत्रातील बाहेरून येणाºया महामार्गाच्या दुर्दशेबद्दल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाºयांबरोबर याबाबत चर्चा करून आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी नागरिक जागृती मंचला दिली आहे.
‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांपासून महामार्गांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर याप्रश्नी नागरिक जागृती मंचतर्फे आंदोलनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. येत्या २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीला सांगली-तुंग रस्त्यावरील सर्व खड्ड्यांना नेत्यांची व अधिकाºयांची नावे देऊन तसे फलक झळकविण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणासह मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाºयांसहीत सर्व आमदार, खासदारांनाही पत्रे पाठविली आहेत. पत्र प्राप्त होताच जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी त्यास प्रतिसाद दिला. सांगली-तुंग रस्त्याच्या रखडलेल्या कामाबद्दल संबंधित विभागाच्या अधिकाºयांना बोलावून याबाबत चर्चा करण्याचे तसेच निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले आहे.
याप्रश्नी आता नागरिकांमधूनही संताप व्यक्त होत असून, आंदोलनासाठी विविध पक्ष, संघटना आणि नागरिकही एकवटत आहेत. सांगली-तुंग रस्त्याप्रमाणेच सांगली-अंकली, मिरज-म्हैसाळ या रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दलही लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येत्या काही दिवसांमध्ये महामार्गांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर आंदोलनांचे सत्र सुरू होणार आहे. सांगली-तुंग आणि सांगली-अंकली या मार्गावर गेल्या दहा वर्षांत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अजूनही असे अपघात होतच आहेत.
गांधी जयंतीपर्यंत महामार्गाचे काम सुरू करा!
नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर म्हणाले की, जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी याप्रश्नी दखल घेतल्यामुळे हा प्रश्न सुटेल, याबाबत आशावादी आहोत. त्यांनी नेहमीच सांगलीच्या विविध प्रश्नांबाबत सतर्कता दाखविली आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही, तर ठरल्याप्रमाणे आम्ही महात्मा गांधी जयंतीला खड्डे नामांतराचा कार्यक्रम करण्यावर ठाम आहोत. याकामी हलगर्जीपणा झालेला दिसून येतो. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर कारवाईबाबतही निर्णय घेण्यात यावा, अन्यथा हे काम तातडीने पूर्ण करावे.