सुखवाडीत मगरीचा वृद्धावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 03:22 PM2017-10-17T15:22:30+5:302017-10-18T10:25:40+5:30

सुखवाडी (ता. पलूस) येथील भीमराव दत्तू पाटील (वय ७७) या वृद्धावर कृष्णा नदीमध्ये मगरीने हल्ला केला. मगरीने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. प्रसंगावधान राखून तातडीने पाटील पाण्याबाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. सोमवारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली.

Crocodile attack on Sukhwadi | सुखवाडीत मगरीचा वृद्धावर हल्ला

सुखवाडीत मगरीचा वृद्धावर हल्ला

Next
ठळक मुद्देवृद्धाच्या हाताच्या अंगठ्यास मगरीने घेतला चावा केवळ दैव बलवत्तर म्हणून जीव बचावलामगरींचा बंदोबस्त करा, ग्रामस्थांमधून मागणी

भिलवडी , दि. १७ : सुखवाडी (ता. पलूस) येथील भीमराव दत्तू पाटील (वय ७७) या वृद्धावर कृष्णा नदीमध्ये मगरीने हल्ला केला. मगरीने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. प्रसंगावधान राखून तातडीने पाटील पाण्याबाहेर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. सोमवारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली.


भीमराव पाटील हे श्री संतोष भारती मठात सेवेकरी आहेत. नेहमीप्रमाणे पहाटे ते कृष्णा नदीकाठी पाणवठ्यावर अंघोळ करण्यासाठी गेले होते. अंघोळ करीत असताना अचानक मगरीने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ चावा घेतला. मगरीने हात पकडल्याची जाणीव होताच प्रसंगावधान राखून क्षणार्धात ते पाण्यातून बाहेर पडले. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले.


दरम्यान, ही माहिती काही वेळातच गावात समजली. भीमराव पाटील यांचे चिरंजीव कृष्णा पाटील व हरी पाटील, तसेच नातू अमृतेश यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
सरपंच संदीप पाटील, पोलिसपाटील अनिकेत जगताप, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष भगवान जगताप, पाणी पुरवठा कर्मचारी प्रकाश यादव व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.


मगरींचा बंदोबस्त करा...

कृष्णा नदीत मगरींची संख्या वाढली असून, वरच्यावर त्यांचे पाणवठ्यावर दर्शन होते. यापूर्वीही अनेकदा मगरींच्या हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. वन विभागाने त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Web Title: Crocodile attack on Sukhwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.