म्हैसाळ भ्रूणहत्येचा तपास सीआयडीकडे द्यावा
By admin | Published: March 16, 2017 03:53 PM2017-03-16T15:53:44+5:302017-03-16T15:59:19+5:30
गिरीष लाड, असिम सरोदे : विशेष सरकारी वकीलांची शासनाकडे मागणी
आॅनलाईन लोकमत
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्येचा तपास स्थानिक पोलिसांना पुरावे गोळा करण्यास फारसे यश येणार नाही. यासाठी हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी गर्भलिंग निदान प्रतिबंधाची चळवळ उभा करणारे अॅड. गिरीश लाड व अॅड. असिम सरोदे यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.
लाड म्हणाले की, भ्रूण हत्येमध्ये केवळ डॉक्टरांनाच दोष देणे चुकीचे आहे. भ्रूण हत्येची सुरुवात लोकांपासून होत आहे. वंशाला मुलगा पाहिजे, या जुन्या विचाराना पगडा अजूनही आहे. लोकच जर मुलगी नको मुलगा पाहिजे, असे म्हणत असेल तर भ्रूण हत्येचे ह्यरॅकेटह्ण सुरुच राहिल. गर्भलिंग निदान तपासणी, गर्भपात व भ्रूण हत्या हे चक्र लोक व डॉक्टर यांच्या संगनमताने सुरु आहे. ही साखळी तोडण्यासाठी जो कायदा आहे, त्याची आरोग्य विभागाने कडक अंमलबजावणी केली पाहिजे. जे कुटूंब महिलेवर गर्भपातासाठी दबाव आणतात, त्या कुटूंबावर विशेषत: महिलेच्या पतीविरुद्धही गुन्हा दाखल केला पाहिजे. म्हैसाळ प्रकरणात १९ भ्रूण सापडले. या सर्व भ्रूणांची डीएनए तपासणी करुन मातांचा शोध घेतला तर त्यांचे १९ पती जेलमध्ये जाऊ शकतात. यासाठी पोलिसांनी अत्यंत सखोल तपास करुन बारकाईने पुरावे गोळा केले पाहिजेत. सीआयडी विभागाकडे असे पुराव गोळा करण्याचे तंत्रज्ञान अवगत असल्याने हा तपास त्यांच्याकडे द्यावा.
लाड म्हणाले की, राज्यात गेल २०-२५ वर्षात सोनोग्राफी यंत्राचा पसार झाला. मात्र याचा सर्वाधिक दुरुपयोगच होत आला आहे. राज्यात मुलींचा जन्मदर अत्यंत कमी झाला आहे. मग आरोग्य विभाग काय काम करतो? असा प्रश्न उपस्थित होतो. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी उपाययोजना सुचवूनही शासन त्याकडे लक्ष देत नाही. हेच काम आम्ही राजस्थानमध्ये केले. सोनोग्राफी यंत्राला अ?ॅक्टिव्ह ट्रॅकर यंत्रणा बसविली. त्यामुळे गरदोर महिलांची रितसर नोंद होऊ लागली. शासनाकडे ही नोंदीचे ह्यअपडेटह्ण येऊ लागले. त्यामुळे तिथे आता मुलींचा जन्मदर वाढला आहे. राजस्थानमध्ये हे शक्य होत असेल तर महाराष्ट्रात का नाही? आज लग्नाला मुली मिळत नाही, अशी ओरड सुरु आहे. आणि खरंच आहे. मुली मिळत नाहीत, यामागे २०-२५ वषार्पूर्वी बसविलेल्या सोनोग्राफी यंत्राचा दुरुपयोग होत असल्याचा परिणाम आहे.
मुंड जेलमध्ये तरीही...
लाड व सरोदे म्हणाले, बीडमध्ये भ्रूणांची हत्या करुन ते कुत्र्यांना खायला देणारा डॉ. मुंड सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. तरीही म्हैसाळचे प्रकरण घडले. बीड आणि म्हैसाळचे प्रकरण साम्य आहे. बीडचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाने सक्षमपणे काम केलेले नाही. म्हैसाळच्या प्रकरणात खिद्रापुरेला क्लिन चिट देणारी आरोग्य यंत्रणाच कारणीभूत ठरली. तरीही यातील अधिकाऱ्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही. अधिवेशनमध्ये एकाही आमदाराने हा प्रश्न उपस्थित केला नाही. मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्राच्या बलात्कारच्या गुन्ह्यात दुसरा क्रमांक लागत आहे.