‘झिरो पेमेंट’ प्रणालीसाठी बेदाणा व्यापारी आग्रही -:पारदर्शकतेसाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:06 AM2019-11-02T00:06:31+5:302019-11-02T00:09:26+5:30
याचा शेतकरी, व्यापारी, अडते यांना फायदा होतो. दस-यापासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत बेदाणे सौदे बंद ठेवून हे व्यवहार पूर्ण केले जातात. देशभरातील व्यापा-यांकडून काही रक्कम येणे बाकी पूर्ण केली जाते.
शरद जाधव ।
सांगली : संपूर्ण देशात बेदाण्यासाठी सांगलीचीबाजारपेठ अग्रेसर असताना, त्यातील व्यवहारही पारदर्शी व्हावेत यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. वर्षभरातील सर्व व्यवहार पूर्ण व्हावेत व कोणाकडूनही येणे-देणे राहू नये यासाठी गेल्या दहा वर्षापासून झिरो पेमेंट संकल्पना राबविण्यात येत आहे. यंदाही महिन्यासाठी सौदे बंद असून या कालावधित व्यवहार पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
बेदाण्याची वार्षिक उलाढाल करोडो रूपयांची असल्याने त्यात फसवणूक होण्याची शक्यता असते. अनेकवेळा आपली पत नसतानाही काही व्यापारी मोठ्या प्रमाणावर बेदाणा खरेदी करतात व नंतर पैसे देताना विलंब लावला जातो. तसेच काही व्यापाऱ्यांनी मात्र, बाजारपेठेतील आपली पत कायम राखली आहे. त्यामुळे लाखो रूपयांचे व्यवहार होऊनही पैसे कुठेही अडकत नाहीत. जे व्यापारी व्यवहार पूर्ण करत नाहीत, त्यांच्यावर ‘बॅन’ घातला जातो.
सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशनच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून ‘झिरो पेमेंट’ संकल्पना राबविली जाते. त्यानुसार वर्षभर झालेले व्यवहार या कालावधित पूर्ण करावयाचे असतात. याचा शेतकरी, व्यापारी, अडते यांना फायदा होतो. दस-यापासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत बेदाणे सौदे बंद ठेवून हे व्यवहार पूर्ण केले जातात. देशभरातील व्यापा-यांकडून काही रक्कम येणे बाकी पूर्ण केली जाते.
बेदाणा व्यवहारात सध्या ३५ ते ४५ दिवसांचा कालावधी असतो. मात्र, इतर ड्रायफ्रूटचा विचार करता, अनेक ठिकाणी रोखीने व्यवहार होत असतात. बेदाण्यासाठीही केवळ आठवड्याची ‘साईड’ देण्याची मागणी नेहमी केली जात आहे, तर बेदाण्याचेही व्यवहार कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी व्यापारी आग्रही आहेत.
बेदाण्यातही ‘ड्रायफ्रूट’प्रमाणे व्यवहार आवश्यक
गुजरातमधील उंजा या शहरात जिºयाची मोठी बाजारपेठ आहे. हजार ते १५०० रूपये प्रतिकिलो असलेल्या जि-याचे व्यवहार मात्र रोखीने होतात. रोखीने नसले तरी किमान धनादेश देऊनच खरेदी केली जाते. असे व्यवहार होण्यास अडचणी असल्या तरी, बेदाण्याची करोडो रूपयांची उलाढाल असताना पैशासाठी मात्र ४० दिवस थांबावे लागते. त्याऐवजी किमान ड्रायफ्रूटच्या इतर व्यापाराप्रमाणे व्यवहार होण्याची मागणी आहे. ड्रायफ्रूटच असलेल्या काजूच्या व्यवहारात सहाव्या दिवशी व्यवहार पूर्ण केले जातात.
शेतकरी, व्यापाºयांसह बेदाणा व्यवसायातील सर्व घटकांसाठी झिरो पेमेंट संकल्पना फायदेशीर आहे. मात्र, यंदा झिरो पेमेंट होण्यासाठी व्यापाºयांनी आग्रही राहावे. व्यापाºयांनी एकत्र येत याबाबत निर्णय घेतल्यास झिरो पेमेंट संकल्पना यशस्वी होणार आहे.
- प्रशांत पाटील-मजलेकर, व्यापारी