ग्राहकांच्या तक्रारींनी ओलांडला पंधरा हजारी टप्पा
By admin | Published: March 14, 2017 11:44 PM2017-03-14T23:44:56+5:302017-03-14T23:44:56+5:30
राज्यातही डंका : प्रकरणांचा निपटारा करण्यातही मोठ्या शहरांच्या तुलनेत सांगली जिल्हा मंच आघाडीवर
अविनाश कोळी ल्ल सांगली
जिल्ह्यातील ग्राहकांमधील हक्काप्रती जागृतीचा आलेख वाढत असून, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या स्थापनेपासून दाखल झालेल्या तक्रारींची संख्या आता पंधरा हजारावर गेली आहे. यातील १४ हजारावर तक्रारींचा निपटारा करण्यातही येथील मंचला यश मिळाले आहे. तक्रारींच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या राज्यातील मोजक्याच जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश झाला आहे.
ग्राहक संरक्षण कायदा देशात दिनांक २४ डिसेंबर १९८६ रोजी लागू करण्यात आला. राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हास्तरावर ४० जिल्हा ग्राहक मंच कार्यान्वित आहेत. सांगलीचा मंच १९९0 ला कार्यान्वित झाला.
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या आकडेवारीनुसार जुलै २०१५ अखेर स्थापनेपासून दाखल झालेल्या एकूण तक्रारींमध्ये मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांनीच दहा हजारी टप्पा ओलांडला होता. सांगली आजही तक्रारींच्या संख्येत आणि निपटारा करण्याच्या गतीत राज्यात आघाडीवर दिसत आहे. १९९0 पासून फेब्रुवारी २0१७ अखेर जिल्ह्यातील तक्रारींनी पंधरा हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सध्यस्थितीत केवळ १ हजार ९९ प्रकरणे प्रलंबित आहेत. निपटारा करण्याची टक्केवारी ९३ टक्के इतकी आहे.
जानेवारी २0१६ ते डिसेंबर २0१६ या कालावधित जिल्हा मंचाकडे एकूण २७९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारींच्या विवरणानुसार सध्या डॉक्टर, बिल्डर यांच्याबद्दलच्या तक्रारीही दाखल होत आहेत. सहकारी संस्था, पतसंस्था, बॅँकांबाबतच्या तक्रारींचे प्रमाण सांगली जिल्ह्यात सर्वाधिक आहे. यातील अनेक प्रकरणांचा निपटारा झाला आहे.
इशाऱ्यानेही होतो फायदा
अनेक ग्राहकांनी सेवेतील त्रुटीबद्दल, अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसल्याबद्दल ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतरही संबंधित सेवा देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी ग्राहकांना सहकार्य केल्याची उदाहरणेही समोर येत आहेत. त्यामुळे जागृतीचा हासुद्धा फायदा आता ग्राहकांच्या पदरात पडत आहे. राज्यातील स्थिती
जिल्हा मंचकडे स्थापनेपासून जुलै २०१५ पर्यंत दाखल झालेल्या आकेवारीत आघाडीवर असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे
मंच दाखल प्रकरणे निपटारा प्रलंबित
नागपूर१८,९२४१६,९२३२00१
पुण१७,१२९१५,७१५१,४१४
मुंबई १५,७८३१३,७२५२0५८
उपनगर जिल्हा
ठाणे १४,५0१११,३९६३,१0५
कोल्हापूर१४,३८३१३,६७0७१६
जळगाव १३,५७११२,१0४१,४६७
सांगली१२,२५२११,७१४५३८
औरंगाबाद१२,२0७११,९0८२९९