महामार्गांसाठी ४५००० झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:23 AM2020-12-08T04:23:25+5:302020-12-08T04:23:25+5:30
सांगली : महामार्गांमुळे जिल्ह्यात समृद्धीची हिरवाई फुलणार असली तरी त्यासाठी झाडांच्या दोन-चार पिढ्यांचा बळी जाणार आहे. रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर ...
सांगली : महामार्गांमुळे जिल्ह्यात समृद्धीची हिरवाई फुलणार असली तरी त्यासाठी झाडांच्या दोन-चार पिढ्यांचा बळी जाणार आहे. रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गांसाठी तब्बल ४५ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. आतापर्यंत सुमारे वीस हजार झाडांच्या कत्तलीची मोहिम फत्ते झाली आहे. त्यांचे पुनर्रोपण किंवा नव्याने वृक्षलागवडीकडे कोणाचेच लक्ष नाही. पर्यावरणप्रेमींमधूनही उठाव नसल्याची दु:खदायी स्थिती आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा (क्रमांक एनएच १६६) ६६ किलोमीटर भाग व गुहागर-विजापूर (क्रमांक १६६ ई अणि एनएच २६६) महामार्गाचा सुमारे १९० किलोमीटर भाग जिल्ह्यातून जातो. यासाठी दुतर्फाची ४५ हजार झाडे तोडली जात आहेत. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. कोठेही वृक्षारोपण सुरु केलेल
िल्ह वृक्षलागवड मोहिमेत गेल्या पाच वर्षांत ९२ लाख ११ हजार ८५५ झाडे लावली गेली. वनविभाग आणि सामाजिक वनीकरणाने ही लागवड केली. यात वनविभागाने ३७ लाख ५५ हजार झाडे लावली. ऑक्टोबरच्या पाहणीनुसार त्यापैकी ३१ लाख ३१ हजार झाडे जिवंत आहेत. सप्टेंबर २०१९ पासून वृक्षलागवड झालेली नाही. यंदा कोरोनामुळे वृक्षारोपण झाले नाही.
जिल्ह्यात ४१ हजार हेक्टर जंगल क्षेत्र
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ८ लाख ६१ हजार हेक्टर आहे. त्यापैकी ४१ हजार ५७५ हेक्टर जंगलक्षेत्र आहे. म्हणजे फक्त ४.३ टक्के जंगलक्षेत्र आहे. दरवर्षी तेथे शासन व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होते. वृक्षतोड अधिक झाडे तोडण्यात येत आहेत. त्यामध्ये जंगलासोबतच खासगी झाडांचाही समावेश आहे. आहे. त्याच्या बदल्यात नवी वृक्ष लागवड सुरु झालेली नाही.
‘महामार्गासाठीची वृक्षतोड प्रक्रिया पारदर्शी नाही. विकासप्रकल्पाच्या नावाखाली रेटून तोड सुरु आहे. तोडल्या जाणारया झाडांचा हिशेबही ठेवलेला नाही. शेकडो वर्षे जुनी वड-पिंपळाची झाडे जमिनदोस्त केली जात आहेत. महामार्ग झाला पाहिजे, पण पर्यावरणाचे भानही ठेवायला हवे’
-- अजित पाटील, मानद सदस्य, वन्यजीव समिती