अण्णासाहेब डांगे यांना डी.लिट्. द्या
By Admin | Published: July 4, 2017 11:34 PM2017-07-04T23:34:49+5:302017-07-04T23:34:49+5:30
अण्णासाहेब डांगे यांना डी.लिट्. द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कामाची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठामार्फत त्यांना डी.लिट्. पदवी मिळाली पाहिजे, असे मत आमदार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार नाईक यांच्या आमदार निधीतून राष्ट्रीय महामार्गापासून सूतगिरणीकडे येणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाची सुरुवात नाईक यांच्याहस्ते करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी आंबा, नारळ, चिक्कू, लिंबू या झाडांचे रोपण करण्यात आले.
आमदार नाईक म्हणाले, डांगे यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणली आहे. लोकशाहीत काम करत असताना आदर्शवत कामाचे उत्तम उदाहरण त्यांनी विधिमंडळातील कामकाजातून समाजापुढे ठेवले आहे. त्यांच्या जीवनावर जीवनगौरव ग्रंथ तयार व्हायला हवा.
दीनदयाळ सूतगिरणीचे कार्यकारी संचालक अॅड. राजेंद्र डांगे यांच्याहस्ते आमदार नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, प्रा. अरुण घोडके, कुंडलिक एडके, सुखदेव पाटील, अजितराव थोरात, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
जि. प. सदस्या सुरेखा जाधव, माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयकर कदम, लालासाहेब पाटील, अशोकराव देसाई, नगरसेविका सुनीता सपकाळ, जयश्री माळी, जयश्री पाटील, शिवाजी डांगे, सी. एच. पाटील, धनपाल माळी, सरपंच सदाशिव दिंडे, रेश्मा मुल्ला, मधुकर वीरकर, किसन गावडे, सुनील कचरे, प्रकाश कनप, कृष्णदेव शेळके, अशोकराव पाटील, भानुदास वीरकर, विलासराव बारपटे, अॅड. मारुती जाधव यावेळी उपस्थित होते.
अध्यक्ष बाळासाहेब खैरे यांनी प्रास्ताविक केले. बजरंग कदम, ए. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक विनोद देशमुख, आर. एस. मिरजे यांनी संयोजन केले.