डी. एस. देशमुख यांचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:22+5:302021-06-11T04:19:22+5:30
कडेगाव पाणी संघर्ष समितीचे प्रमुख डी. एस. देशमुख यांनी टेंभू उपसा सिंचन योजना व महावितरणच्या विरोधात चार दिवसांचे आत्मक्लेश ...
कडेगाव पाणी संघर्ष समितीचे प्रमुख डी. एस. देशमुख यांनी टेंभू उपसा सिंचन योजना व महावितरणच्या
विरोधात चार दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन केले होते तरीही
दखल न घेतल्याने गुरुवारी ते डीपीखाली उलटे टांगून घेऊन निषेध आंदोलन करणार होते.
मात्र, पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन दोन्ही विभागांचे अधिकारी
आणि डी. एस. देशमुख यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणली .
यामुळे हे आंदोलन स्थगित झाले.
टेंभू योजनेचे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे आणि महावितरण कंपनीचे अधिकारी यांनी डी एस देशमुख यांनी केलेल्या मागण्यांपैकी जी कामे त्यांच्या अखत्यारीत आहेत त्या मागण्या मान्य करत असल्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच अखत्यारीत नसलेल्या कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, असेही आश्वासनात म्हटले आहे. त्यामुळे आजचे आंदोलन स्थगित केलेले आहे. चळवळीस चांगल्या नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे, असे डी. एस. देशमुख यांनी सांगितले.
फोटो-१०कडेगाव१
फोटो :
सामाजिक कार्यकर्ते डी एस देशमुख यांच्या मागण्यांबाबत चर्चा कारताना टेंभू योजना व महावितरणचे अधिकारी तसेच पाणीसंघर्ष समितीचे कार्यकर्ते.