मी अनुभवलेले आप्पा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:22 AM2020-12-25T04:22:52+5:302020-12-25T04:22:52+5:30

काळानुसार माणसं बदलली, जातीनुसार देव, धर्म, इच्छा, बदलल्या एवढंच.... काही लोकांनी आपली ‘निष्ठा’ सुध्दा बदलली, पण या बदलत्या काळातसुध्दा ...

Dad I experienced ... | मी अनुभवलेले आप्पा...

मी अनुभवलेले आप्पा...

Next

काळानुसार माणसं बदलली,

जातीनुसार देव, धर्म, इच्छा, बदलल्या एवढंच....

काही लोकांनी आपली ‘निष्ठा’ सुध्दा बदलली, पण या बदलत्या काळातसुध्दा काही व्यक्तिमत्त्वं बदलली नाहीत. त्यांनी आपल्या समाजसेवेचा आणि समाजोन्नतीचा वसा जपला. असे राजस व्यक्तिमत्त्व म्हणजेच मा. महेंद्र (आप्पा) लाड. त्यांचा आज वाढदिवस... त्यानिमित्त दोन शब्द.

पलूस तालुक्याच्या निर्मितीनंतर त्याच्या विकासामध्ये अत्यंत मोलाची भूमिका मा. महेंद्रआप्पांनी निभावली आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून अल्पकाळातच पलूसचा वेगवान विकास झालेला दिसून येतो. तहसील कार्यालय, कृषी विभाग कार्यालय, पीडब्ल्यूडी, खरेदी-विक्री संघ, पंचायत समिती आदींचा देदीप्यमान विकास आपल्या लक्षात येतो. पलूसमधील रस्त्यांचे दुपदरीकरण, स्ट्रीटलाईट, सांडपाणी व्यवस्था, प्रशस्त फूटपाथ, नवीन बस स्टॅण्ड, रुग्णालये आदी विकासकामांमुळे आप्पांच्या कामाचा ठसा उमटला आहे.

कुंडल आणि परिसराचा विचार केला, तर आप्पांनी विविध संस्थांच्या माध्यमातून एक सामाजिक संरचना निर्माण केली आहे. कृष्णा-वेरळा मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी, डॉ. पतंगराव कदम विकास सोसायटी, नवयुवक कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ, महेंद्रआप्पा लाड मित्र मंडळ, सर्वसामान्य जनतेचा आर्थिक कणा असलेली गुरुकृपा ग्रामीण पतसंस्था आदी विविध संस्था समर्थपणे आप्पा चालवित आहेत व या सर्व संस्था सातत्याने विकासाभिमुख होत आहेत. पार्वती लाड एज्यु. सोसायटी, डॉ. पतंगराव कदम प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कुंडल तसेच क्रांतिसिंह नाना पाटील व एक्सीड स्कूल, कुंडल यांच्या माध्यमातून शेकडो मुले गुणवत्तापूर्व व सातत्यपूर्ण शिक्षण घेत आहेत. आप्पांचे सामान्य मुलांबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल असणारे प्रेम सर्वश्रुत आहे.

‘संकल्प प्रतिष्ठान’ व ‘ऋषिकेश भैय्या लाड’ युवा शक्तीच्या माध्यमातून विविध सामाजिक विषय व सामाजिक जाणिवा यावर विचारमंथन सुरू आहे. ‘डॉ. पतंगराव कदम साहेब’ व्याख्यानमाला व इतर सामाजिक उपक्रमांची घोडदौड अखंड सुरू आहे.

नवयुवक कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय कबड्डी, खो-खो स्पर्धांचे आयोजन व संयोजन डोळ्यांचे पारणे फेडून जाते. या सर्व स्पर्धांची देशपातळीवर दखल घेतली जाते.

कुंडल गावच्या विकासासाठी आप्पा सदैव दक्ष आहेत. वाढत्या कुंडलच्या प्राथमिक सोयी-सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, निर्मलग्राम, पाणी अडवा-पाणी जिरवा, इको व्हिलेज, ज्येष्ठ नागरिक संघ, वाचनालये, व्यायामशाळा, बगीचे व इतर हायटेक सोयी-सुविधांबाबत आप्पा नेहमीच प्रयत्नशील आहेत. या सर्वांमुळे सातत्याने जनाधार व जनसंपर्क वाढत आहे. भांडवलदारांची कामे करण्यापेक्षा सर्वसाधारण हिताची, कष्टकरी, श्रमजीवी लोकांना आप्पा नेहमीच मदत करत आहेत. नुकत्याच डफळापूर येथे सुरू होत असलेल्या ‘श्रीपती शुगर्स’ या साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवड करून नामदार डॉ. विश्वजित कदम यांनी त्यांची आणि कुंडलकरांची मान उंचावली आहे. सामाजिक कामाला कारखानदारीची झालर दिल्यामुळे आप्पांच्या कारकीर्दीत भर तर पडली आहेच शिवाय साखर उद्योगात आवश्यक असणारे नेतृत्वही मिळाल्याची भावना जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पुणे पदवीधर निवडणुकीत राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या आदेशानुसार आमदार अरुण (अण्णा) लाड यांच्या विजयात त्यांनी पलूस तालुक्यातून मोलाचा वाटा उचलला.

जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला पराभव पटकन झटकून निकालानंतर लगेच जनसेवेसाठी बाहेर पडून पुढच्या समाजसेवेसाठी ते तयार राहिले. हा लढवय्या बाणा आप्पांच्या आयुष्यातील सर्वात जमेची बाजू आहे. आप्पा नेहमी म्हणतात, कोणतेही काम करत असताना प्रामाणिकपणे काम करत जावा, यश तुमच्या मागे आल्याशिवाय राहणार नाही. कुंडल ग्रामपंचायतीमध्ये गेल्या ५० वर्षांत जे यश मिळाले नाही, ते यश मिळवले. जिल्हा परिषदेत पराभव आणि ग्रामपंचायतीचे यश असा सहा महिन्यांत आलेला सुखद आणि दुःखद अनुभव पाहता, आप्पा भविष्यातसुद्धा अशीच झेप घेतील, याचा मला विश्वास आहे.

२००३ मध्ये कुंडलमध्ये शैक्षणिक संस्थेची उभारणी करत असताना गावातील सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना संचालक मंडळ तयार करत अस्टणा एवढ्या मोठ्या संस्थेत माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीची सचिव म्हणून निवड केली, ही बाब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भूषणावह आहे. एखाद्या कार्यकर्त्याला काय द्यायची वेळ आली तर ते द्यायची दानत यांच्याकडेच आहे.

आप्पांच्या एकंदर कार्याचा विचार केला, तर आप्पांचे जीवन विलक्षण पारदर्शी, प्रेरणादायी आहे. त्यामागे सामाजिक जीवन आहे, आपलेपणाची जाणीव आहे, आपल्या कामाशी निष्ठा आहे. ज्येष्ठ व युवक यांच्या विचारातील एक सुवर्णमध्य, वैचारिक प्रगल्भता आप्पांच्या ठिकाणी दिसून येते. म्हणून आपल्या सर्वांचा ‘स्वाभिमान’ असणारे मा. महेंद्रआप्पा यांना वाढदिवसाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा!

चौकट..

माझ्या वयाच्या २९ व्या वर्षापासून गेली २१ वर्षे जवळून पाहिलेले आप्पा कसे ? तर, ते म्हणजे जे पोटात असेल तेच ओठात असणारे, त्यांना कधीही आत एक आणि बाहेर एक जमले नाही. छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत कोणत्याही कार्यकर्त्याला दुजाभाव न करता त्याला जिवाभावाचा समजून त्याच्या कौटुंबिक सुख-दुःखात नेहमी सहभाग घेणारे, सगळ्याच वयोगटात आपलासा वाटणारा हक्काचा माणूस, कार्यकर्ता प्रबळ झाला पाहिजे, हे एकमेव ध्येय असणारे, फणसासारखे बाहेरून कडक व आतून नरम असणारे, कार्यकर्त्यांच्या दुःखात क्षणात डोळे भरून येणारे, कधीही सत्ता, संपत्ती, पद या गोष्टींचा हव्यास नसणारे, कार्यर्त्यांनी कार्यकर्त्यांसाठी केलेले नेतृत्व, कार्यकर्त्यांना ही शंभर हत्तीचे बळ येते, जेव्हा ते ‘म्हणतात, मी आप्पांचा कार्यकर्ता आहे’ असे आप्पा मी अनुभवले.

लेखक: उमेश हुंडावळे,

शब्दांकन : आशुतोष कस्तुरे, कुंडल

Web Title: Dad I experienced ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.