अवैध दारूवाहतूकप्रकरणी दाेघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:11+5:302021-04-28T04:29:11+5:30

कोकरुड : जिल्हा बंदी असतानाही बिळाशी (ता. शिराळा) येथे अवैधरीत्या दारूची वाहतूक केल्या प्रकरणी सोंडोली (ता. शाहूवाडी) येथील दोघांवर ...

Dagha arrested in illegal liquor case | अवैध दारूवाहतूकप्रकरणी दाेघांना अटक

अवैध दारूवाहतूकप्रकरणी दाेघांना अटक

Next

कोकरुड : जिल्हा बंदी असतानाही बिळाशी (ता. शिराळा) येथे अवैधरीत्या दारूची वाहतूक केल्या प्रकरणी सोंडोली (ता. शाहूवाडी) येथील दोघांवर कारवाई करून देशी दारूच्या ४८ बाटल्यांसह ३२ हजार ४९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत कोकरुड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांचे गस्तीपथक गस्त कोकरुड-शिराळा रोडवर गस्त घालत असताना सोंडोली येथील आनंदा गुंगा पाटील (वय ४०) व बाळू गुंगा पाटील (वय ४४) हे दोघे जण मोटरसायकलवरून (क्र. एमएच ०१ एजी ५००१) भेडसगाव येथून बिळाशीकडे येत असताना गस्ती पथकाने त्यांची चौकशी करून तपासणी केली. त्यांच्याकडे देशी दारूच्या ४८ बाटल्या आढळून आल्या. त्यांच्यावर कारवाई करत मोटरसायकलसह ३२ हजार ४९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकरुड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गस्ती पथकातील अझर गवंडी, हिंदुराव पाटील, विशाल भोसले, मोहसीन मुल्ला यांनी ही कारवाई केली.

Web Title: Dagha arrested in illegal liquor case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.