वीज बिलाबाबत दलित महासंघाची आष्ट्यात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:29 AM2021-02-24T04:29:05+5:302021-02-24T04:29:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, आष्टा : कोरोना काळातील वीजबिल माफ करावे तसेच ज्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे, ते त्वरित जोडण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
आष्टा : कोरोना काळातील वीजबिल माफ करावे तसेच ज्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे, ते त्वरित जोडण्यात यावे, या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने आष्टा येथील महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
दलित महासंघ युवक आघाडीचे अध्यक्ष सुधाकर वायदंडे, आष्टा शहरप्रमुख नारायण वायदंडे, शहराध्यक्षा संगीता घस्ते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंता विजयकुमार गुरव यांना देण्यात आले. गुरव यांनी तोडलेले कनेक्शन जोडण्याचे आदेश देऊन वरिष्ठ स्तरावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी दिनकर नांगरे, निवास घस्ते, भारती शिंदे, संगीता घस्ते, प्रताप घस्ते, सुजित वारे, संभाजी मस्के, नंदू दाभाडे, दिलीप टोमके, सूरज मोहिते उपस्थित होते.