दलितमित्र श्यामराव शेळके यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:28 AM2021-03-17T04:28:05+5:302021-03-17T04:28:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार, दलितमित्र श्यामराव मुकुंद शेळके (७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा :
येथील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार, दलितमित्र श्यामराव मुकुंद शेळके (७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून काम केले. रामापूर (ता. कडेगाव) येथे लोकसहभागातून हायस्कूल सुरू केले. गेली सुमारे ४५ वर्षे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने अनेक चळवळींमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. १९६२ च्या दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संपर्कात आले असता भूमी आंदोलन करून सावकारांच्या ताब्यातील गहाण असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत ताब्यात मिळवून दिल्या. शेकापचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबत काम केले. १९७२ च्या दुष्काळात शेळके महाराष्ट्र डीएड कृती समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी आंदोलन करून विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले. त्यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार, २००३ मध्ये महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, सत्यशोधक समितीचा सत्यशोधक पुरस्कार मिळाला होता. त्यांनी काही काळ विविध वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.