अखेर सांगलीतील कृष्णा नदीवरील धोकादायक बनलेला बंधाऱ्याचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 02:10 PM2023-03-01T14:10:00+5:302023-03-01T14:11:19+5:30
हे काम तीन महिन्यांमध्ये पूर्ण होणार
सुरेंद्र दुपटे
सांगली : शहरातील कृष्णा नदीवरील धोकादायक बनलेला बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम सांगली पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. यासाठी ९ लाख ८८ हजार ३५६ रुपये इतका खर्च करून पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. या कामाची पाहणी सांगली पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी आदित्य मोहिते यांनी केले.
सांगली पाटबंधारे विभागातर्फे सांगलीच्या कृष्णा नदीवर असणाऱ्या बंधारा सध्या धोकादायक बनला होता. या बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम तीन महिन्यांमध्ये पूर्ण होणार असून ९ लाख ८८ हजार ३५६ रुपये इतका खर्च करून या बंधाऱ्याच्या स्लॅबचे काम सुरू झाले आहे. सध्या तरी शेतकरी बांधव मच्छीमार व या पुलावरून इजा करणाऱ्या नागरिकांनी या पुलाचा वापर करू नये. व पाटबंधारे विभागास सहकार्य करण्याचे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी आदित्य मोहिते यांनी केले आहे.