अतिवृष्टी व पुरामुळे सांगली जिल्ह्यातील 925 हेक्टर जमीनीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 02:22 PM2021-07-30T14:22:41+5:302021-07-30T14:23:25+5:30
Flood Sangli : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जमिन खरबडुन जाणे, गाळ साचणे, गाळ, वाळूचा थर तीन इंचापेक्षा जास्त साचणे यामुळे 181 गावातील 925 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली आहे
सांगली : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जमिन खरबडुन जाणे, गाळ साचणे, गाळ, वाळूचा थर तीन इंचापेक्षा जास्त साचणे यामुळे 181 गावातील 925 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली आहे
जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला असून यामध्ये मिरज, वाळवा, शिराळा व पलूस या चार तालुक्यातील 181 गावांमधील 8 हजार 8 शेतकऱ्यांच्या 925 हेक्टर जमीनीचे नुकसान झाल आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील 10, वाळवा तालुक्यातील 56, शिराळा तालुक्यातील 95, पलुस तालुक्यातील 20 गावे बाधीत झाली आहेत.
यामध्ये यामध्ये 4 हजार 190 शेतकऱ्यांच्या 455 हेक्टर वरील जमीन खरवडुन गेली आहे. तर 3 हजार 818 शेतकऱ्यांच्या 470 हेक्टर वरील जमीनवर गाळ, वाळु, मातीचा थर तीन इंचापेक्षा जास्त साचल्याने नुकसान झाले आहे. असे ही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी कळविले आहे.