सांगलीत घरगुती वादातून मोटारीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:53+5:302021-06-06T04:19:53+5:30
सांगली : शहरातील गावभाग परिसरात जुन्या घरगुती वादातून चारचाकी वाहनाचे ५० हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. याप्रकरणी रुपाली बंडोपंत ...
सांगली : शहरातील गावभाग परिसरात जुन्या घरगुती वादातून चारचाकी वाहनाचे ५० हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. याप्रकरणी रुपाली बंडोपंत दडगे-पाटील यांनी मयुर सुधाकर पाटील (वय २५) आणि विनायक सुधाकर पाटील (वय ३२, रा. पाटील गल्ली, गावभाग सांगली) या दोघा भावांविरोधात सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रुपाली दडगे-पाटील व संशयित मयुर आणि विनायक यांच्यामध्ये जुना घरगुती वाद आहे. यातून पाटील यांनी रुपाली यांच्या चारचाकी वाहनाचे नुकसान केले होते. याची फिर्याद देण्यासाठी रुपाली या शहर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या.
यावेळेत संशयितांनी रुपाली यांच्या घरात घुसून रुपाली यांच्या मुलांना शिवीगाळ करत धमकी दिली. या घटनेची शहर पोलिसात नोंद असून पोलीस पुढील तपास करत आहेत.