पेठ येथील अंगणवाडीच्या इमारतीला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:32 AM2021-04-30T04:32:45+5:302021-04-30T04:32:45+5:30
पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा ओढा पात्राच्या संरक्षण भिंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कोसळली. त्यांची पाहणी जिल्हा परिषद सभापती ...
पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा ओढा पात्राच्या संरक्षण भिंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कोसळली. त्यांची पाहणी जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ माळी यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील तिळगंगा ओढा पात्राच्या संरक्षण भिंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कोसळल्याने त्या जवळ असलेल्या अंगणवाडी इमारतीला धोका निर्माण झाला आहे. तरी पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधकाम पूर्ण केले जावे, अशी सूचना जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांनी संबंधीत विभागाला दिली.
मंगळवारी रात्री अचानक झालेल्या पावसाने झोडपून काढल्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले होते. अनेक विद्युत खांब कोसळले होते. त्याचबरोबर तिळगंगा ओढ्यालगत असणाऱ्या महादेव मंदिर व अंगणवाडीजवळ असलेल्या पात्रात असणाऱ्या संरक्षण भिंत कोसळली. यामुळे मंदिर व अंगणवाडी इमारतीला मोठा धोका निर्माण झाली आहे. अनेक वर्षे या ओढ्याला मोठे महापूर येत आहेत. यामुळे पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. शासकीय लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली इमारतीला धोका होऊ शकतो. तरी हे बांधकाम पूर्ण केले जावे अशी मागणी केली जात आहे.