अर्धवट तुटलेल्या पवनचक्की पात्यांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:27 AM2021-03-23T04:27:21+5:302021-03-23T04:27:21+5:30
कोकरुड : गुढे-पाचगणीसह पठारावरील पवनचक्कीच्या पात्यांची विविध कारणाने अर्धवट मोडतोड झाली आहे. ही पाती शेतकरी आणि जनावरांना धोकादायक असल्याने ...
कोकरुड : गुढे-पाचगणीसह पठारावरील पवनचक्कीच्या पात्यांची विविध कारणाने अर्धवट मोडतोड झाली आहे. ही पाती शेतकरी आणि जनावरांना धोकादायक असल्याने यांची दुरुस्ती करावी अथवा पाती सोडवून ठेवावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
गुढे, पाचगणी, पणुंब्रे, चरण, येळापूर, शिरसटवाडी, सावंतवाडी, मेणी या गावांच्या पठारावर विविध कंपन्यांचे शेकडो पवनचक्की प्रकल्प उभे आहेत. मात्र या पवनचक्कीवर वीज पडून, तसेच वातावरणातील बदल, जीर्ण झालेली पाती, मशीन यामुळे पाती मोडकळीस आली आहेत. अशी अर्धवट मोडून पडलेली अनेक पाती आहेत. अशा पवनचक्कीखाली मोठ्या प्रमाणात जनावरे चरावयास येत असतात. सोबत जनावरांचे मालक, शेतकरी अनेक प्रकारच्या कामानिमित्त फिरत असल्याने, याचा मोठा धोका असून अशी धोकादायक पाती काढून टाकावीत अथवा त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.